Find the Best शब्दरंग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Nilbrothers
चार भिंतींच्या घराला ही कसा घरपणाचा आता करार लागतो.. झोपडीच्या पाचटाला ही जेंव्हा खरया माणुसकीचा भार वाटतो.. भोगते यातना ही अंतरी व्यथा का पोरका अंधार मनात दाटतो.. मुठीतच राहिल्या सुगंधी जख्मा का भास स्मृतींचा...पुन्हा पेटतो.. दिखावे किती करावे...ते फसवे का मुखवट्यात मी असा फसतो.. त्या गर्दीत..सावल्या झाल्या गर्द का मलाच मी..असा का भासतो.. ©Nilbrothers #शब्दरंग
शब्दवेडा किशोर
शब्द शोधला तर अर्थ.. वाढला तर कलह.. सोसला तर सांत्वन.. शब्द अक्षय पण आहे अन् निःशब्द पण आहे.... हळवी असतात ती मने जी शब्दांनी मोडली जातात शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे जोडली जातात.... शब्द असतात तेज हत्यारे ज्यांनी माणसे कापली जातात.... शब्द असतात मौनसागर शांततेत खूप काही शिकवणारी.... शब्द असतात ज्वालामुखी अगदी सहज इतरांना जाळून भस्म करणारी.... ©शब्दवेडा किशोर #शब्दरंग
Dev Maurya
शब्दों में पिरोया जाये ऐसे जज्बात कहा, कम्बल से गरमाहत आये ऐसा एहसास कहा, जो सूरज की किरण में दिख जाये वैसा प्यार कहा, जो पानी से बुझ जाये वैसी प्यास कहा..... ©Dev Maurya #शब्द#शब्दरंग
Nilbrothers
दुसऱ्याचा मनाचा विचार न करता सतत आपल्याच मना सारखं मनमानी वागणं म्हणजे हुशारी नव्हे.... उलट अश्या वागण्याने आपण दुसऱ्याच्या मनाला पदो पदी दुखावतच असतो... अजानपणे नकळत... मग ती व्यक्ती जवळची असो...की...दूरची...बास काही जण....हे मनाच दुखावन बोलून दाखवतील तर काही जण...कायम....अबोल राहून कुढत राहतील... मनातल्या मनात....तुमच्या वागण्या बद्दल... ©Nilbrothers #शब्दरंग
gaurav
गारगार गोड थोडी स्पर्शली अंगी भिरकी..... ऊन नव्यान जग हिंडती जोडी... कुडकुड थोडी सावळा खेळ रचली... असो तहान कि ऊन थंडी झोंबली.... कोणता ही विरक्य भरभर चिवचिव झाली... निसर्ग र तुझी लिलया अगाध.... झाली पहाट चिवचिव उठली झालो सावध... रूप जस भरभर दव बिंदु भर.... झोंबती सोसाट्याचा वारा गार..... निरखुनी बघ जरा वातावरण कस झाल.... रूप तुझ दाऊन आज पांग भेडल.... तुळशी ती शांती दोर कशी परगटली तु.... पांडुरंगा नाम तुझ पहाटेच दर्शन किती हुरुप... हरी तुझ विन कसी होईल ही पहाट.... ऊभा तु सामोरी ना येई आडवी वाट.... सावळा तु विठु नामी.... तुझ्या विना ही पहाट नाही.... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्या विना पहाट नाही... #तुझ्याविनापहाटनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य
read moreShankar Kamble
...गझल... बोलू कुणांस आता? शब्द माझे हरवलेले समजेल कोण भाषा? भाव अर्थ गोठलेले पायांस रोखणारा उभा धाक उंबऱ्याचा मुक्या पैंजणा आडोशी किती घाव वेचलेले निढळी करांस ठेवून वाट पाहते अधीरा ढळली उदास सांज घाट संयमी बुडलेले जपतो कशांस आता?कप्प्यात मोरपीस तुटले उगांच मोती धाग्यात माळलेले चुकले चुकार कोठे? कळपात वासरांच्या गलबलून जीव आला हंबऱ्यात बोललेले नसणार मी उद्याला भास कोरडा असेल छळले स्वतःस मीही नजरेत बोचलेले गावातला जुना तो आज पार पोरका भासे पिकली गळून गेली पानांत शोधलेले ©Shankar Kamble #Foggy #gazal #gazals #शब्द #शब्दरंग #विरह_वेदना #प्रेम
Shankar Kamble
जड झाले पाय जरी वाट तरी चालतो आपण खांदेपालट करून जराशी ओझे ‘तेच‘ वाहतो आपण... मी नाही बरे त्यातला ’बरे’ तेच सांगतो आपण कोण बरोबर? कोण चुकीचा? खरे कधी वागतो आपण? अपराधी तर इथेच सारे गुन्हा कोणता करतो आपण? मूकपणाने अन्यायाचे गर्भ पोसतो उदरी आपण... नव उड्डाणे आव्हानांची रोज नवी आखतो आपण जगण्यामधल्या आनंदाचा गंध कधी भोगतो आपण? कवेत घेण्या आकाशाला पंख पसरतो सारे आपण कर्तव्याचा भारच इतका जमिनीपुरते उरतो आपण... प्राक्तनाचे भोग अकल्पित अवधाने रांधतो आपण भोगाची जोडून वल्कले काय उसने सांधतो आपण? रंगमंच हा जीवनाचा किती नाटके करतो आपण पडदा पडता एकदाचा अंक नवा जोडतो आपण... ©Shankar Kamble #Flower #गझल #शब्दरंग #शब्द #गजल #शब्दांचेअवजार #जगणे_येथे_महाग_झाले #जग
#Flower #गझल #शब्दरंग #शब्द #गजल #शब्दांचेअवजार #जगणे_येथे_महाग_झाले #जग
read moreशब्दवेडा किशोर
क्षण ते वेचताना मन माझे हरवले माझ्या काव्य शब्दप्रतिभेला सुर नवे गवसले आज माझ्या जिवा एक आभास झाला जणु ह्या मनाला प्रेमाने प्रतिसाद ती माझी शब्दकाव्यलता घाले बघता जव मी त्या दिशेला मला उमगेना आभास हा माझा कि माझे मनच ते आतुरले खेळ भावनेचे हे आज रेशमी शब्दांनी कवणात मखमली वलयाच्या मोहरासम मी शब्दमालेत गुंतविले शब्दरूपी त्या सोनेरी ऊबेत आज माझे मन अनाहुत सुखावले भावनेतले ते सारेच भाव आज शब्दात मी माळूनीया मग खळखळत्या झऱ्यापरी आज हृदयातील भावगाथेचे स्वछंदस्वरूप पाझर वाहीले ©शब्दवेडा किशोर #शब्दरंग #शब्दांचे_मोरपीस
Nilbrothers
ऐखादया निरव विसाव्याच्या विरंगूळयात माणूस इतका गुंततो की...आयुष्याचा प्रवास शिल्लक राहीला आहे..!! हेच विसरतो आणी विसाव्यालाच आपला कायम थांबा समजतो... पण सत्य काही वेगळेच असत... सूखावणाऱ्या क्षणाना मागे टाकून पुन्हा नव्या प्रवासाला निघायला तयार व्हावच लागत...!! आयुष्यात स्थिर अस काही नाही..प्रत्यंतर...घडत असतात...पदोपदी...बास आपल्याला वेळ..काळ..आणी मर्यादा...ओळखता यायला हव्यात...!! दिगंता कडुन अंता कडे चाललेला हा आपला प्रवास हेच शास्वत खर सत्य आहे...!! ©Nilbrothers #शब्दरंग
Shankar Kamble
शब्दांना यावी धार इतकी* *शब्दच व्हावे शस्त्र आता* *खोडून काढू जीर्ण ओरखडे* *शब्दांनी घडवू झुकवू माथा* *शब्द म्हणजे कुणां वाटतो* *भास प्रपंच अक्षरांचा* *धागा धागा जुळूनी येतां* *ध्यासपर्व हा परिवर्तनाचा* *नका समजू दुबळे इतके* *असह्य आणि केविलवाणे* *पेटून उठली किती मस्तके* *शब्दांच्या केवळ जाणीवेने* *पिचलेल्या मनगटांत भरते* *बळ पोलादी शब्दाने* *मुक्यासही फुटते मग वाचा* *बंड चेतते शब्दाने* *सखे सोबती दीपस्तंभ हे* *वाट दाविती जगण्याची* *अमृताहुन मधाळ गोडी* *कधी कठोरता वज्राची* *नव्या युगाच्या नव्या पाईका* *शब्दवसा हा हाती घे* *नकोस गुंफु भ्रमिक कल्पना* *जग वास्तवाचे टिपून घे* ©Shankar Kamble #शब्दांचेअवजार #शब्द #शब्दरंग #आक्रोश #उठाव #बंड #शब्दवेडा #परिवर्तन #Light