Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्दांचे_मोरपीस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्दांचे_मोरपीस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 4 Stories

शब्दवेडा किशोर

क्षण ते वेचताना मन माझे हरवले
माझ्या काव्य शब्दप्रतिभेला
सुर नवे गवसले आज माझ्या जिवा
एक आभास झाला जणु ह्या मनाला प्रेमाने
प्रतिसाद ती माझी शब्दकाव्यलता घाले
बघता जव मी त्या दिशेला मला उमगेना
आभास हा माझा कि माझे मनच ते आतुरले

खेळ भावनेचे हे आज रेशमी शब्दांनी कवणात
मखमली वलयाच्या मोहरासम मी शब्दमालेत गुंतविले
शब्दरूपी त्या सोनेरी ऊबेत आज माझे
मन अनाहुत सुखावले
भावनेतले ते सारेच भाव आज
शब्दात मी माळूनीया मग खळखळत्या
झऱ्यापरी आज
हृदयातील भावगाथेचे
स्वछंदस्वरूप पाझर वाहीले

©शब्दवेडा किशोर #शब्दरंग
#शब्दांचे_मोरपीस

सचिन झरे

कातरवेळी मनास स्पर्शून जातो वारा,
भावनेचा शब्दच करतात कोंडमारा,
मग आठवणी सुद्धा देत नाहीत थारा,
अन् डोळ्यांतून बरसतात जलधारा.

श्वासांचाही चढतो मग भलताच पारा,
ह्रदयातला माझ्या जेव्हा फुलतो निखारा,
घाव बसायचाच फक्त अवकाश असतो,
ऐरणीवर पडून असतो जीव तळमळणारा.

जळणाऱ्या भट्टीत होतो त्याचा स्विकार
लोखंडाच्या तुकड्याला मिळतो आकार,
जिवन होतं त्याचं त्या घावानी साकार, 
तूझ्या माझ्या प्रेमाचा हाच असावा प्रकार.

एखादी जळती भट्टी जमून येते कातरवेळी,
लोहाराच्या भात्याचा मदतनीस होतो वारा,
आठवणींचा तूझ्या फुलत जातो निखारा,
अन् त्या पेटत्या निखाऱ्यांवर जळतो जीव सारा.

बरसतात तूझ्या अबोल्याचे घाव वर्मावर,
अन् शहारलेल्या ह्रदयाचा बदलतो आकार,
तो आकार तसाच राहतो आसवांच्या स्पर्शावर,
तरीही होत नाही तूला माझ्या प्रेमाचा स्विकार.

कातरवेळी मनास स्पर्शून गेलेला वारा,
भावनेचा शब्दांनीच केलेला कोंडमारा,
अन् आठवणींनी सुद्धा न दिलेला थारा,
तूझ्या माझ्या प्रेमाचाच वाटतो प्रकार सारा....

सचिन झरे. #शब्दांचे_मोरपीस

सचिन झरे

उधार घेतलेल्या शब्दांवर, भावनेचं कर्ज फेडायचं असतं, 
मुद्दलासहीत आठवणींचे, न चुकता व्याजही द्यायचं असतं,
करतो शेती स्वप्नांची, पण आठवणींचं व्याज वाढत जातं,
कर्तव्याची मशागत करूनही, आयुष्य मात्र कर्जबाजारीच 
राहतं.....

सचिन झरे. #शब्दांचे_मोरपीस

सचिन झरे

 #शब्दांचे_मोरपीस

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile