जड झाले पाय जरी वाट तरी चालतो आपण खांदेपालट करून जराशी ओझे ‘तेच‘ वाहतो आपण... मी नाही बरे त्यातला ’बरे’ तेच सांगतो आपण कोण बरोबर? कोण चुकीचा? खरे कधी वागतो आपण? अपराधी तर इथेच सारे गुन्हा कोणता करतो आपण? मूकपणाने अन्यायाचे गर्भ पोसतो उदरी आपण... नव उड्डाणे आव्हानांची रोज नवी आखतो आपण जगण्यामधल्या आनंदाचा गंध कधी भोगतो आपण? कवेत घेण्या आकाशाला पंख पसरतो सारे आपण कर्तव्याचा भारच इतका जमिनीपुरते उरतो आपण... प्राक्तनाचे भोग अकल्पित अवधाने रांधतो आपण भोगाची जोडून वल्कले काय उसने सांधतो आपण? रंगमंच हा जीवनाचा किती नाटके करतो आपण पडदा पडता एकदाचा अंक नवा जोडतो आपण... ©Shankar Kamble #Flower #गझल #शब्दरंग #शब्द #गजल #शब्दांचेअवजार #जगणे_येथे_महाग_झाले #जग