Find the Best वळीवाचापाऊस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shankar Kamble
_*रितं डोळं नी आभाळ*_ *_पाणी पापणी सुकलं*_ *_ओढ कोरड मातीला*_ *_हिरवं सपान लोपलं*_ *_ताफा ढगांचा रुसला*_ *_चौमुलखी पांगयीला*_ *_हात ठेऊनी निढळी*_ *_किती आर्जवू तयाला*_ *_गेला मिरग कोरडा*_ *_काळजाला ओरखडा*_ *_कूस सूनी वांझ माती*_ *_किती उदरी गुताडा*_ *_कोंब कोवळ जळालं*_ _*भेगा दाटल्या मनांत*_ *_सुखं चांदणं तोरणं*_ *_घर राहिलं उन्हांत*_ *_मेघ सावळ्या दयाळा*_ *_आतां बरसं धुधारी*_ *_किती जीव काकुलती*_ *_वात फुलव शिवारी*_ *__सुखं पेरलं मातीत*__ *_ओटी भरीन मोत्यानी*_ *_सारा भार तुझ्यावर*_ *_माळ सजव सोन्यानी*_ ©Shankar Kamble #पाऊस #पाऊसधारा #दुष्काळ #वारा #वळीवाचापाऊस #मृग #पाऊस #dewdrops
Shankar Kamble
रानमातीला गहिवर सोसवंना होरपळ जीव झाला तोळामोळा किती जोडावी ठिगळं आस डोळां पाणावाती करपली तृण पाती कसा मोहरे अंकुर? जीव आला काकुलती कर ठेवूनी निढळी तुटं आतडीचा पीळ मागमूस हरपला कुठं वळीवाची सर? तनां- मनांची काहीली कसा वैशाख तापला ताप निवाराया कोण? मेघराजाजी कोपला हिरमुसली पानं- फुलं रंग नव्हाळी सुकला सरीसरीचं गोंदण देह धरणी आसावला काळ्यां नभांच्या राशींनी आसमंत हा उजळू दे मोत्यां- मोत्यांची रांगोळी रान- शिवारी सजू दे ©Shankar Kamble #पाऊसधारा #सर #वळीवाचापाऊस #वळीव #विरह #पाऊसाततुझीआठवण #Beauty
#पाऊसधारा #सर #वळीवाचापाऊस #वळीव #विरह #पाऊसाततुझीआठवण #Beauty
read moreShankar kamble
*भुई भेगाळली खोल* *ओलं मातीची सरली* *डोळं कोरडं आभाळ* *एक उदासी भरली...* *वेड्या-वाकड्या वळणी* *उभी एकाकी बाभळ* *सूर व्याकूळ आळवी* *उन्हं कलता कोकीळ...* *वावटळीचा भिंगोरा* *जीव होई कासावीस* *पानं देठाला पारखं* *जीणं बेवारशी कूस...* *निपचीत पहुडल्या* *सांज धूळीत सावल्या* *मागं सरता सरता* *खुणां काहीशा उरल्या...* *गर्द सोनेरी, पिवळा* *पानगळतीचा सडा* *पायाखाली तुडवीता* *आठवणींचा गुताडा...* *भूल कसली मनाला?* *कल्प कुसुमी दाटला* *आस वळीवाची आता* *देही काहूर पेटला...* ©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात #sand
#माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात #sand
read moreShankar kamble
Shankar kamble
आल्या वळीवाच्या सरी माती न्हाती धुती झाली बीजं रुजलं काळजात सांज शहारून आली भेगाळल्या जीवा असं शिंपण सुखाचं माळ शिवारात फुलं आता सपान मोत्याचं वणव्यात वैशाखाच्या सुखं करपून गेलं करणी त्या परमेशाची डोळं नभाचं पाणावलं ठाई ठाई पांढरीत मेघराशी बरसल्या सुपाएवढं काळीज बळीराजा हरखला फुट मनाला अंकुर हात जोडी धरतीला सुखं पेरलं मातीत सारा भार देवा तुला ओटी भरली ओंजळ पिकं येवो मायंदळ सोन्या मोत्याची ही रास आता भरू दे हे खळ ©Shankar kamble #पाऊस #पाऊसधारा #शेतकरी #पेरणी #शेती #वळीवाचापाऊस #धारा #पाणी_पाऊस_देगा_देवा
Sachin Zanje
आठवणीतला वळीवाचा पाऊस. वळवाची आठवण अशी नकळत आलेल्या पावण्यागत जशी. तप्त करते ती सर , भुमीला येण्या अगोदर चिंब जाते भिजवून ,भरते कोराडा तो सरोवर. तुझ्या अशा पाण्याने होतो, मातीचा ही चिखल चहुकडे बहरून येते हिरवळ, असे तुझे ते मोल. तुझ्या आगमनाने जनास कळते दिवस पावसाळ्याचे सुरू झाले दाखवते.. कवी :- सचिन सदाशिव झंजे. ©Sachin Zanje #वळीवाचापाऊस.#पाऊस.#पावसाचीचाहुल.
#वळीवाचापाऊस.#पाऊस.#पावसाचीचाहुल.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited