Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाणी_पाऊस_देगा_देवा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाणी_पाऊस_देगा_देवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Shankar Kamble

*कसं आभाळ फाटलं* 
 *पाणी डोळ्यांत दाटलं* 
 *चिंब भिजला संसार* 
 *सुख पूरात लोटलं...* 

 *काडी– काडी जमविली* 
 *खोपा सुंदर विणला* 
 *रात्र भयाण काळोखी* 
 *चांद उजेडा शिणला...* 

 *शेतं शिवारं भिजली* 
 *मोती पाण्यात कुजली* 
 *घाम मातीमोल झाला* 
 *कळ उरांत थिजली...* 

 *घाव उरावरी कसा* 
 *सल भळभळ दाटे* 
 *सुख स्वप्नांचा चुराडा* 
 *मनी बोचतात काटे...* 

 *जाळ चुलीचा विझला* 
 *आग पेटली पोटात* 
 *जिवाभावाची माणसं* 
 *दूर पुराच्या लाटेतं...* 

 *पूर ओसरलं उद्या* 
 *सारं होईल सारखं* 
 *खुणां कोरलेल्या उरी* 
 *जीवा जगणं पारखं...*

©Shankar Kamble #पूर #पाऊस #पाणी #पाणी_पाऊस_देगा_देवा #

#baarish

Shankar kamble

आल्या वळीवाच्या सरी
 माती न्हाती धुती झाली
 बीजं रुजलं काळजात
 सांज शहारून आली

 भेगाळल्या जीवा
 असं शिंपण सुखाचं
 माळ शिवारात फुलं
 आता सपान मोत्याचं

 वणव्यात वैशाखाच्या
 सुखं करपून गेलं
 करणी त्या परमेशाची
 डोळं नभाचं पाणावलं

 ठाई ठाई पांढरीत
 मेघराशी बरसल्या
 सुपाएवढं काळीज
 बळीराजा हरखला

 फुट मनाला अंकुर
 हात जोडी धरतीला
 सुखं पेरलं मातीत
 सारा भार देवा तुला

 ओटी भरली ओंजळ
 पिकं येवो मायंदळ
 सोन्या मोत्याची ही रास
 आता भरू दे हे खळ

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#शेतकरी 
#पेरणी
#शेती 
#वळीवाचापाऊस 
#धारा 
#पाणी_पाऊस_देगा_देवा

Shrutika_Ubhad

पाणी-पाऊस देगा देवा 
आधी सोडून रुसवा
साऱ्या रानावनतहि 
आता फुलुदे गारवा..

आम्ही भक्तगण तुझे 
आणि तूच आमचा देव 
जीवन अवलबुंन आमचे 
तुझ्यावर आहे रे सदैव..

गंगा वाहते रे आता 
कास्तकाराच्या डोळ्यातून
प्राण मुरतो त्याचा या 
काळ्या तप्त मतीतून..

हिरविगार धरती माता 
आता वाळत गेली रे 
तिच्यासाठी तरी आता
 पावसाच्यासरी देरेे..
पावसाच्या सरी देरे.. #पाणी_पाऊस_देगा_देवा
#मराठी_कविता
#love_comment_share😊

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile