Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाऊसधारा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाऊसधारा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 10 Followers
  • 18 Stories

शब्दवेडा किशोर

#पाऊसझूला
मंद धुंद वारा वाजवी पावा भोवताली 
आनंद भरल्या श्रावणाची ही पहाट आली
मृदू लवलवत्या पात्याची श्रावणी चालली थरथर
दवबिंदूचे चुंबन वारा ही भरभर
मास हा उत्सवाचा सुवासिनीच्या गर्वाचा
सडा गं पडणार सखे आनंदाच्या पर्वाचा
अलगद मनी सुखावती त्या श्रावणसरी
मोत्यांच्या  माळेतली बने गुंफण भारी
इंद्रधनुष्याचे रंग मना स्पर्शून जाते
अशा श्रावणी पहाटे चित्त हर्षून जाते 
चमचमत्या शालूत लक्ष्मी घेते पदर
आकाशी वैष्णवांचा मेळा आनंदे भरपूर
सडासंमार्जन करती लगबग स्वागतार्ह श्रावणाच्या
कल्पकतेची गोंदून रांगोळी लेण्या सौभाग्याच्या
छान तृणावर डोले लाजून वेलीवरची कळी
सुवासिनीच्या मुक्तहास्याने पडते गाली खळी
रानमेवा हा खुणावतो रानोरानी अन् मनात
पक्ष्यांची मंजूळ किलबिल घुमतेय रानात
मोर नाचरा फेर धरुनी नुतन मनमंदिरी
मखमली हा मास लाभला झेलू श्रावणसरी
रंग बहरले इथे फुलात रमलो वृंदावनी
खेळ खेळती पाऊसझूला सार्‍याच गवळणी
उगवला तो सूर्य सखा गं तेजस्वी गंधफूला
आपण दोघी कोकीळमैना झुलवू पाऊसझूला
बोल घेवडा बनला भाट मनी एकच इच्छा
ओल्याचिंब पावसाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #पाऊसधारा

Shankar Kamble

सये सर पावसाची आली अवचित आज
मृदूगंध शहारतो नव्या नवतीचा बाज

थेंब टपोरी, बिलोरी घर ,आंगण भिजले
नक्षी माळता मोत्यांचे देह तरुंचे सजले

शीरशीर अलवार काटा फुटतो कोवळा
बीजं रुजता मातीत सुखं स्वप्नांचा सोहळा

देह, गात्रांत साठवं ओल  मनांच्या तळाशी
श्वास श्वासांत भारता लाट पारखी जळाशी

मोर पिसारा फुलता डोळे भरले नभाचे
शुभ्र कोंदण लाभले दान पावले मनाचे

घेई भरून ओंजळ खोल भिजू दे पाऊस
पाठशिवणीचा खेळ नको परत जाऊस

©Shankar Kamble #zindagikerang #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #सर #धारा #पाऊस_आणि_आठवण #पाऊसआला #पाऊस_आणि_प्रेम

Dileep Bhope

दाटल्या आभाळा सांगायची सोय नसे 
सर पावसाची आत दडली धावून येते

कळेना प्रेमात कोण कुणाच्या कधी 
ती जाणीव उन्हाळी पाऊस घेवून येते!

©Dileep Bhope #पाऊसधारा

somnath gawade

OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #पाऊसधारा#marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी Collaborating with Hemangi S

read more
पाऊस धारा घेऊन आल्या मृदगंध 
ओलसर आठवणी करती जीवन समृद्ध OPEN FOR COLLAB🌷♥️ शेरास सव्वाशेर. 🧠 दोन ओळी✍️ आपल्या पोस्ट “share highlight” करायला विसरू नका.   शुभसंध्या मित्रहो 😊

#पाऊसधारा#marathiwriter #marathisher #marathiquotes #मराठी #marathicollab #yqtaai


 #YourQuoteAndMine
Collaborating with शब्दसारथी 
Collaborating with Hemangi S

Dr Mangesh Kankonkar

Written By

©Dr Mangesh Kankonkar #पाऊस 
#पाऊसधारा

शब्दवेडा किशोर

हा पहाटेचा पाऊस अन्  
   माझे डोळे मिटलेले.. 
                                      तुझे माझे क्षण ओवताना मनात 
                      काही क्षण सुटलेले..

©शब्दवेडा किशोर #पाऊसधारा

Ravidesai02

Shankar Kamble

*काळया मेघुटांचा भार* 
 *गंध दरवळ मातीला* 
 *ओली हिरवाई माखली* 
 *सांज भुलली उन्हाला..* 

 *कोंब कोंब तरारले* 
 *झाली पोटुशी धरणी* 
 *पान्हा अमृत पाजते* 
 *जणू पाडसा हरिणी..* 

 *पायवाट हरवल्या* 
 *जुनी ओळख पुसली* 
 *ओंजळ आठवांची* 
 *कुठे मनांत दाटली..* 

 *शुभ्र धुक्याची चादर* 
 *नक्षी सजली कोवळी* 
 *रोमरोमी देहांतूनी* 
 *दाटे नवीन नव्हाळी..* 

 *निळे डोळे मोरपंखी* 
 *आले भरून पिसारा* 
 *किती साठवू पाऊस* 
 *रिता मनाचा गाभारा..*

©Shankar Kamble #पाउस #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #पाऊसधारा #पाणी #सर #पाऊस_पडून_गेल्यावर 

#rain

Shankar Kamble

_*रितं डोळं नी आभाळ*_ 
 *_पाणी पापणी सुकलं*_ 
 *_ओढ कोरड मातीला*_ 
 *_हिरवं सपान लोपलं*_ 

 *_ताफा ढगांचा रुसला*_ 
 *_चौमुलखी पांगयीला*_ 
 *_हात ठेऊनी निढळी*_ 
 *_किती आर्जवू तयाला*_ 

 *_गेला मिरग कोरडा*_ 
 *_काळजाला ओरखडा*_ 
 *_कूस सूनी वांझ माती*_ 
 *_किती उदरी गुताडा*_ 

 *_कोंब कोवळ जळालं*_ 
 _*भेगा दाटल्या मनांत*_ 
 *_सुखं चांदणं तोरणं*_ 
 *_घर राहिलं उन्हांत*_ 

 *_मेघ सावळ्या दयाळा*_ 
 *_आतां बरसं धुधारी*_ 
 *_किती जीव काकुलती*_ 
 *_वात फुलव शिवारी*_ 

 *__सुखं पेरलं मातीत*__ 
 *_ओटी भरीन मोत्यानी*_ 
 *_सारा भार तुझ्यावर*_ 
 *_माळ सजव सोन्यानी*_

©Shankar Kamble #पाऊस #पाऊसधारा #दुष्काळ #वारा #वळीवाचापाऊस #मृग #पाऊस 

#dewdrops

Shankar Kamble

रानमातीला गहिवर
सोसवंना होरपळ
जीव झाला तोळामोळा
किती जोडावी ठिगळं

आस डोळां पाणावाती
करपली तृण पाती
कसा मोहरे अंकुर?
जीव आला काकुलती

कर ठेवूनी निढळी
तुटं आतडीचा पीळ
मागमूस हरपला
कुठं वळीवाची सर?

तनां- मनांची काहीली
कसा वैशाख तापला
ताप निवाराया कोण?
मेघराजाजी कोपला

हिरमुसली पानं- फुलं
रंग नव्हाळी सुकला
सरीसरीचं गोंदण
देह धरणी आसावला

काळ्यां नभांच्या राशींनी
आसमंत हा उजळू दे
मोत्यां- मोत्यांची रांगोळी
रान- शिवारी सजू दे

©Shankar Kamble #पाऊसधारा #सर #वळीवाचापाऊस #वळीव #विरह #पाऊसाततुझीआठवण 

#Beauty
loader
Home
Explore
Events
Notification
Profile