Nojoto: Largest Storytelling Platform

Best पाऊसाला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पाऊसाला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 5 Stories

Shankar Kamble

सये सर पावसाची आली अवचित आज
मृदूगंध शहारतो नव्या नवतीचा बाज

थेंब टपोरी, बिलोरी घर ,आंगण भिजले
नक्षी माळता मोत्यांचे देह तरुंचे सजले

शीरशीर अलवार काटा फुटतो कोवळा
बीजं रुजता मातीत सुखं स्वप्नांचा सोहळा

देह, गात्रांत साठवं ओल  मनांच्या तळाशी
श्वास श्वासांत भारता लाट पारखी जळाशी

मोर पिसारा फुलता डोळे भरले नभाचे
शुभ्र कोंदण लाभले दान पावले मनाचे

घेई भरून ओंजळ खोल भिजू दे पाऊस
पाठशिवणीचा खेळ नको परत जाऊस

©Shankar Kamble #zindagikerang #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #सर #धारा #पाऊस_आणि_आठवण #पाऊसआला #पाऊस_आणि_प्रेम

Shankar Kamble

*काळया मेघुटांचा भार* 
 *गंध दरवळ मातीला* 
 *ओली हिरवाई माखली* 
 *सांज भुलली उन्हाला..* 

 *कोंब कोंब तरारले* 
 *झाली पोटुशी धरणी* 
 *पान्हा अमृत पाजते* 
 *जणू पाडसा हरिणी..* 

 *पायवाट हरवल्या* 
 *जुनी ओळख पुसली* 
 *ओंजळ आठवांची* 
 *कुठे मनांत दाटली..* 

 *शुभ्र धुक्याची चादर* 
 *नक्षी सजली कोवळी* 
 *रोमरोमी देहांतूनी* 
 *दाटे नवीन नव्हाळी..* 

 *निळे डोळे मोरपंखी* 
 *आले भरून पिसारा* 
 *किती साठवू पाऊस* 
 *रिता मनाचा गाभारा..*

©Shankar Kamble #पाउस #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #पाऊसधारा #पाणी #सर #पाऊस_पडून_गेल्यावर 

#rain

Shankar kamble

Shankar kamble

*दशाक्षरी काव्यरचना.* 
 *मेघ दाटले....* 
 *मेघ दाटले काजळ काळे* 
 *मनी हर्षाचे झुले उमाळे* 
 *मोर पिसाचे फुलले डोळे* 
 *मातीचाही गंध दरवळे* 

 *वाट पाहिली चातकापरी* 
 *अलवार येती मृगसरी* 
 *तनां-मनां या भिडल्या धारा* 
 *सूर अवचित ओठावरी* 

 *थेंब नाचे टपटपणारे* 
 *खळखळ नादे जळभारे* 
 *अवखळ चंचल हे वारे* 
 *सृजनाला ये उधाण सारे* 

 *बीज अंकुरे धरणी पोटी* 
 *येती जुळूनी मीलन गाठी* 
 *साज मखमली झऱ्या काठी* 
 *इंद्रधनू मग येई भेटी* 

 *पानोपानी छटा उमटल्या* 
 *गर्द पोपटी हिरव्या ओल्या* 
 *बहरून आल्या नभांगणी* 
 *घन सावळ्या हरिणी न्हाल्या*

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#पाऊसाततुझीआठवण 
#पाऊस_पडून_गेल्यावर 
#पाऊसाला 
#थेंब 
#थेंबाचे 
#सरी

Shankar kamble

*झाकोळले नभ* 
 *पिसाटला वारा* 
 *आसावली धरा* 
 *मीलना अधीरा...* 
                         *अवेळी धिंगाणा* 
                          *अल्लड सरींचा* 
                            *भिजल्या पंखांना* 
                              *ध्यास घरट्याचा...* 
 *गंधाळली माती* 
 *कस्तुरी सुवास* 
 *भेगाळल्या मनां* 
 *अंकुरली आस...* 
                           *कुंभातून आल्या* 
                      *झरझर सरी* 
                        *शिंपले अमृत* 
                           *माळरानावरी...* 
 *ओघळ पाण्याचे* 
 *खळखळ भारी* 
 *नाद उन्मेषाचा* 
 *चेतवला उरी...* 
                    *प्रसवली भूमी* 
                    *तरारले बीजं* 
                    *जपलं उदरीं* 
                           *स्वप्नं तुझं माझं...*

©Shankar kamble #पाऊस 
#पाऊसधारा 
#पाऊसाततुझीआठवण 
#नभ 
#पाऊसाचा 
#पाऊसाला 
#पाऊसावर

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile