Nojoto: Largest Storytelling Platform

Best उन्हाळ्यात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उन्हाळ्यात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutउन्हाळ्यात कोणते कपडे घालतात, उन्हाळ्यात कोणती फळे येतात, उन्हाळ्यात वाळवणीचे पदार्थ, उन्हाळ्यातील वाळवणाचे पदार्थ, उन्हाळ्यातील आहार,

  • 1 Followers
  • 1 Stories

Shankar kamble

*भुई भेगाळली खोल* 
 *ओलं मातीची सरली* 
 *डोळं कोरडं आभाळ* 
 *एक उदासी भरली...* 

 *वेड्या-वाकड्या वळणी* 
 *उभी एकाकी बाभळ* 
 *सूर व्याकूळ आळवी* 
 *उन्हं कलता कोकीळ...* 

 *वावटळीचा भिंगोरा* 
 *जीव होई कासावीस* 
 *पानं देठाला पारखं* 
 *जीणं बेवारशी कूस...* 

 *निपचीत पहुडल्या* 
 *सांज धूळीत सावल्या* 
 *मागं सरता सरता* 
 *खुणां काहीशा उरल्या...* 

 *गर्द सोनेरी, पिवळा* 
 *पानगळतीचा सडा* 
 *पायाखाली तुडवीता* 
 *आठवणींचा गुताडा...* 

 *भूल कसली मनाला?* 
 *कल्प कुसुमी दाटला* 
 *आस वळीवाची आता* 
 *देही काहूर पेटला...*

©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात 

#sand

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile