Find the Best सांगा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
sandy
#सांगा कसं #जगायचं ? कण्हत कण्हत की गाणं म्हणत ? तुम्हीच ठरवा.. डोळे भरून तुमची आठवण कुणी तरी काढतच ना! उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना ? शाप देत बसायचं कि दुवा देत हसायचं?
Aishwarya Padwal
मुली पन strong असतात काही दिवसापूर्वी एका लग्न समारंभात गेले होते तिथे बिदाई च्या वेळी नवरी मुलगी आक्रोश करत रडत होती तेव्हा जवळ उभे असणारे एक काका बोलले ,'ह्या मुली पन ना नुसत्या रडूबाई असतात,strong राहनं काय जमत नाही,तेव्हा त्याना मी देऊ इच्छीलेला हे उत्तर प्रेम करतात मनापासून,प्रेमासाठी दुनियेशी लाढतात पन आई बाबाच्या शब्दाखातर त्याच प्रेमाचा त्याग ही करतात कोण म्हणता सांगा मग की मुली strong नसतात? नवरा आपला सर्वस्वा मानून हासत संसाराचा गाडा रेटतात दुख जरी आलं वाट्याला तरी नशिबाचे भोग समजून सारं काही समावुन घेत असतात कोन म्हणता सांगा मग की मुली strong नसतात? मरणयातना सोसतना आपल्या बाळाला जन्म देत असतात आई होण्यासाठी फक्त जीवाचं रान करत असतात कोण म्हणता सांगा मग की मुली strong नसतात? मुलगी,बहिण,बायको,आई,सूने ची कर्तव्या चोखपणे पार पाढतात स्वतःच्या इच्छा आकांक्षा टाळून दुसर्याच्या सुखासाठी झटतात कोन म्हणता सांगा मग की मुली strong नसतात? -ऐश्वर्या पडवळ
Er. Govinda Polad
मनाच्या काळजाला हुंदक्यांचे पुरावे प्रेमाच्या सीमेवरती प्रियकरांचे दुरावे कोण म्हणतो साहेब काळ हा बदलला ते नाणे होणे नाही जे खर्चूनीही उरावे तो प्रश्न भाकरीचा आजही तसाच आहे सहज मिळे कोणा कोणी आजन्म झुरावे जिंकली आवाम भ्रष्टी जिंकले राजनेते हरतेच लोकशाही तरी सांगा कीती हरावे प्राण सैनिकांचा जरी शौर्याची जाण देतो लेकरांनी मायभूच्या आणखी किती मरावे कोरड्या मातीत जात आहे प्राण शेतकऱ्याचा सांगा आभाळाच्या दिशेने आता हात किती करावे -गोविंद अनिल पोलाड
#स्वयं
पृथ्वीला, कोरून कोरून रस्ते अन चोरून चोरून पाणी काढलं होतं मला कधीच पुरलं नाही, जे ताटात माझ्या वाढलं होतं मग सांगा कुण्या तोंडानं म्हणू, दुष्काळानं भरडलं होतं... आमची गर्दी इतकी झाली, कि नदीचं पात्रच उरलं होतं समदं माहित होतं तरीबी, तिथं मजबुरीनं उभारलं होतं मग सांगा कुण्या तोंडानं म्हणू, घरात पाणी भरलं होतं... डोंगर पोखरून, निसर्ग टोकरून घराचं स्वप्न पहिलं होतं पण, फांदीवर बसून, फांदी तासून सुरक्षित कोण राहिलं होतं...
Suraj Kanthawar
City [8/1, 14:36] Ravi Tawade: संजयभाऊ देरकर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्त्यांची बैठक संपन्न आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. त्यादृष्टीने सर्वच उमेदवार आता प्रचाराच्या कामाला लागले आहे. आज रविवार दिनांक31 जुलै रोजी रात्री 8 वाजता संजयभाऊ देरकर यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांना संजयभाऊ देरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांनीही विविध विषयांवर चर्चा केली. आगामी विधासभा निवडणूक लढण्याचा निश्चय करण्यात आला असून आता केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा आदेश संजयभाऊ देरकर यांनी यावेळी दिला. या चर्चेला मोठ्या संख्येने वणी पंचायात समिती भागातील समर्थक उपस्थित होते. [8/2, 10:05] Golu Bhat: *प्रिय* , *अमिर खान* आपण येत्या 4 तारखेला चंद्रपूर जिल्ह्यात येत आहात आम्हा चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेसाठी खुप अभिमानास्पद बाब आहे. आपण एक उत्तम कलाकार तर आहातच त्याचबरोबर आजच्या युवकांचे आयडाँल पण आहात . आपण आमच्या जिल्ह्यात काही महत्वाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येत आहात अस माहीत झाले . आपणाला जे मंत्री आणनार आहेत ते तुम्हाला जिल्ह्यातील त्यांच्या हातातुन झालेल्या कामाचा आढावा दाखवतील. ते तुम्हाला या जिल्ह्यातील बगिचे ,पार्क,बसस्टँन्ड ,सिमेंट चे रस्ते ,प्राण्यांचे पुतळे ,सैनिकी स्कुल ,आणि (निर्जीव) विकासात्मक केलेल्या कामाची पाहणी करुन स्वत:ची स्तुती करायला लावतील. तुम्हालापण हे सगळ पाहुन त्यांचा गौरव करावासा वाटेल आणि त्या पद्धतीने आपल्या सभोवताली आपण सुधिर भाऊ मुनगंटीवार यांचीच स्तुती कराल असे वातावरण तयार केल्या जाईल आणि तुम्हालापण सुधिरभाऊ काही निवडक गोष्टीच दाखवतील व कदाचित तुम्हीपण त्यांच्या देखाव्याला खरे मानुन विकासाचा महामेरु म्हणुन गौरव कराल . पण अमिर खान जी तुम्ही या जिल्ह्यात आल्यानंतर येथील बंद पडलेल्या कारखान्याबद्दल विचारा,या जिल्ह्यातील कामगारांच्या समस्या खुप वाढल्या आहेत त्याकडे लक्ष द्यायला सांगा, जिल्ह्यातील लाखो बेरोजगारांबद्दल विचारा, आरोग्याच्या सोयी , सिंचनाच्या सोयी ,प्रदुषण ,येथिल मस्तावलेल्या सत्ताधार्यांचा मनमानी ,दडपशाही धोरणाबद्दल विचारा, निक्रुष्ठ दर्जाचे बांधकाम करुन करोडो रुपये ठेकेदारांनी व सत्ताधार्यांनी हडपले त्याबद्दल विचारा , होऊ शकेल तर सुधिरभाऊना त्यांनी बांधलेल्या करोडो रुपयाच्या घराबद्दलही विचारा ,या जिल्ह्यातील युवक चुकीच्या मार्गाने जाऊन नशा करत आहेत तेही विचारा, दारुबंदी जिल्हा असुनही गल्लोगल्लीत नकली दारु मिळते त्याबद्दलही विचारा अशी जिल्ह्यातील जनतेची आर्त हाक आहे . अमिर खान जी क्रुपा करुन यांच्या खोट्या देखाव्याला बळी पडु नका !! हे तुम्हाला खोटा निर्जीव विकास दाखवतील पण या जिल्ह्यात बर्याच समस्या आहेत . शेतकरी, कामगार, बेरोजगार ,छोटे मोटे व्यवसायीक,व्यापारी , गोरगरिब जनता ,विद्यार्थी ,शिक्षण ,आरोग्य यांच्या फार गंभिर समस्या आहेत त्या वेळ मिळेल तर नक्की विचारुन मा.मंत्रीमहोदयाना त्या पुर्ण करायला सांगा हीच आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व जनतेकडुन नम्र विनंती आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 suraj
suraj
read moreVishakhaBorkar
बाबा मी जेव्हा हसणार तेव्हा तुम्ही पण दाद द्यायला येणार का? माझ्या चांगल्या गुणांवर पुन्हा शाबासकी मला देणार का? रुसलेच मी कधी तर लाडोबा मला मंननार का? सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? बघते रोज मैत्रीणाला बाबांसोबत त्यांच्या बोलतांना बाबा माझे आसवे वाहतात तेव्हा तुम्ही पुसण्यासाठी येणार का सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? शब्द गोठू जातात माझे फोटो तुमचा बघताना आठवणी असतात सोबती प्रवास जीवणानाचा करतांना प्रवासात थोडी साद देण्यास तुम्ही येणार का सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? लाडकी मी तुमची असेच का सोडून गेले मला जाणिव होते तुमची ती परत तुम्ही पूर्ण करणार का सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? आयुष्याच प्रवास अजून आहे खूप दूर जाणिव नाही एकटे चालण्याची तुम्ही परत माझे बोट पकडून चालवणार का सांगा बर बाबा तुम्ही परतून माझ्यासाठी येणार का? तुमची लाडकी लेक अॅड.विशाखा समाधान बोरकर रा. ता.पातूर जी.अकोला
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited