मनाच्या काळजाला हुंदक्यांचे पुरावे प्रेमाच्या सीमेवरती प्रियकरांचे दुरावे कोण म्हणतो साहेब काळ हा बदलला ते नाणे होणे नाही जे खर्चूनीही उरावे तो प्रश्न भाकरीचा आजही तसाच आहे सहज मिळे कोणा कोणी आजन्म झुरावे जिंकली आवाम भ्रष्टी जिंकले राजनेते हरतेच लोकशाही तरी सांगा कीती हरावे प्राण सैनिकांचा जरी शौर्याची जाण देतो लेकरांनी मायभूच्या आणखी किती मरावे कोरड्या मातीत जात आहे प्राण शेतकऱ्याचा सांगा आभाळाच्या दिशेने आता हात किती करावे -गोविंद अनिल पोलाड