Nojoto: Largest Storytelling Platform

Best विठू_माऊली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विठू_माऊली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories

Tejz0560

Shankar kamble

*पंढरीच्या वाटे।धावे मन वेडे।* 
 *संसाराचे कोडे।सोडवी तू।* 

 *डोळा वाहे नीर।सुटलासे धीर।* 
 *पाहण्या अधीर।सावळ्याला।* 

 *बहु तापलो मी।संसार या तापे।* 
 *जमविली पापे।नानाविध।* 

 *नेत्रांची काहिली।तूच करी शांत।* 
 *आता ना उसंत।क्षणभरी।* 

 *चरणाशी मिठी।देवू अलिंगन।* 
 *हृदयाची खूण।हृदयाला।* 

 *गण गोत्र तोची।भीमा तटी उभा।* 
 *चैतन्याचा गाभा।शोभतसे।* 

 *पामर पतित।कैसा येवू पुढे।* 
 *विषयां सवडे।निरवावे।* 

 *पुण्याची शिदोरी।आज फळा* *आली।* 
 *भेटाभेट झाली।पांडुरंगे।* 

 *मागणें न काही।आता उरे काय।* 
 *समरस साय।दुग्धासवे।*

©Shankar kamble #विठ्ठल #वारी #पंढरीचीवारी #विठू_माऊली #विठ्ठल_रखुमाई

Mangesh S. Gaikwad

#Life

read more
पांडुरंगा.. मायबापा, 
अनेक दुःख, संकटे जीवनात असून 
सगळ्याला बाजूला ठेवून सगळे
 भक्त तुझ्या दर्शनाची आस लावून बसली आहे...
ही महामारी संपवून तुझ्या दर्शनाची 
वाट तूच मोकळी कर 🙏
#आषाढी_एकादशी #विठू_माऊली








.

©Mangesh S. Gaikwad
  #Life

Mukul Mukund Khodey; कर्मकवी...

#विठू_माऊली तू; माऊली जगाची... हरी ॐ #विठ्ठल_रखुमाई... #आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..🌺🙏🏼😇 https://m.starmakerstudios.com/d/playrecording?app=sm&from_user_id=5629499488717157&is_convert=true&recordingId=5629499350871964&share_type=more

read more
#विठू_माऊली तू; माऊली जगाची...

हरी ॐ #विठ्ठल_रखुमाई...

#आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..🌺🙏🏼😇

https://m.starmakerstudios.com/d/playrecording?app=sm&from_user_id=5629499488717157&is_convert=true&recordingId=5629499350871964&share_type=more

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile