*पंढरीच्या वाटे।धावे मन वेडे।* *संसाराचे कोडे।सोडवी तू।* *डोळा वाहे नीर।सुटलासे धीर।* *पाहण्या अधीर।सावळ्याला।* *बहु तापलो मी।संसार या तापे।* *जमविली पापे।नानाविध।* *नेत्रांची काहिली।तूच करी शांत।* *आता ना उसंत।क्षणभरी।* *चरणाशी मिठी।देवू अलिंगन।* *हृदयाची खूण।हृदयाला।* *गण गोत्र तोची।भीमा तटी उभा।* *चैतन्याचा गाभा।शोभतसे।* *पामर पतित।कैसा येवू पुढे।* *विषयां सवडे।निरवावे।* *पुण्याची शिदोरी।आज फळा* *आली।* *भेटाभेट झाली।पांडुरंगे।* *मागणें न काही।आता उरे काय।* *समरस साय।दुग्धासवे।* ©Shankar kamble #विठ्ठल #वारी #पंढरीचीवारी #विठू_माऊली #विठ्ठल_रखुमाई