Find the Best वारी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutजाऊं तोरे चरण कमल पर वारी lyrics, इक वारी आ, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझा घरी, पंढरीची वारी चित्रपट,
शब्दवेडा किशोर
#वारी चुकायाची न्हाई.... युगेयुगे ऊभा विटेवरी माझा देव विठुराया तिष्ठत सावळे सुंदर ते रूप मनोहर तयाचे आहेच असे की साठवावे ह्दयीच्या कोंदणात युगेयुगे पांडुरंगा आलो तुझ्या दारी कधी नाही चुकवली मी तुझी वारी तरीही का रे देवा माझ्यावरी तु कोपला पावसाच्या रूपात येऊन माझा इर्शाळवाडीतला गोड पिलं असलेला संसार सारा मोडला जरी असेल माझा घरगाडा तिथं गाडला तरीही मी हरणार नाही अन् खरं सांगतो पांडुरंगा बा विठ्ठला उरात श्वास असेपर्यंत मी तुझी वारी चुकविणार नाही.... @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #वारी_आयुष्याची
Dileep Bhope
एक ही वहिवाट नित्य चालत जाणे विठ्ठलाची पायवाट तो विठ्ठलची जाणे.. ©Dileep Bhope #वारी
Gaurav Pramod Deshpande
निघालो घेऊन पादुका साधू संतांच्या संगे टाळ मृदूंगाचा नाद ! नचूकता दरवर्षी करतो वारी संगे विठुरायच्या भेटीची आस! #गौरवMania #वारी वारकरी #Krishna
वारकरी #Krishna
read moreShankar Kamble
*संत सज्जनांचा भार* *वैष्णवांची मांदिआळी* *वाळवंटी भीमा तीरी* *नाद मृदंग चीपळी!!१!!* *विरक्तीचा भाळी टिळा* *करी वैराग्य पताका* *षडरिपुंचा काकडा* *होय तूच ज्ञाना, तुका!!२!!* *मुखी यज्ञ नाम घोष* *फिटे संसार पारणे* *नेत्रं तृप्त सुखावती* *रूप सावळे देखणे!!३!!* *घेतां चरणांशी मिठी* *बंध प्रारब्ध तुटले* *गळागळी भेट झाली* *माझे "मी"पण सुटले!!४!!* *दीन पतीत दुबळा* *आतां एकची मागणे* *पुन्हा नको जन्म फेरा* *विठू हेची रे सांगणे!!५!!* ©Shankar Kamble #वारी #विठ्ठल #विठ्ठल_रखुमाई #वारी_आयुष्याची #वारी_जांऊ #पंढरपूर #कृष्ण #NojotoRamleela
#वारी #विठ्ठल #विठ्ठल_रखुमाई #वारी_आयुष्याची #वारी_जांऊ #पंढरपूर #कृष्ण Ramleela
read moreNishigandha Kakade
वारीस खंड पडला,दुरावा जरी जाहला, श्री चरणास पाहण्या,हा जीव आतुरला!!! टाळ, मृदंग चिपळ्या,तयारी झाली की हो सारी, खोचूनी कासोटा,लेऊनी पदर,डोई डोई तुळस भारी! दिऊन निरोप सासरी,ओढ लागलीसे जीवा, किती कौतुके जाहली,वेळ वारीला लाभावा! थकले होते किती मी रे,राबले कष्टाने संसारी, नाही भूक भागली तरीही,ध्यास तुझाच तो उरी! लेक कुशीत रडली,सासू खूप रे बोलली, गोठा हांबरनारी गाय,मी रे तशीच सोडली! सख्या निघाल्या माझ्या,पाय पळू ते लागती, फुले ,सुगंधी अत्तरी,झुले पालखी सोबती! चाले सर्ज्या-चाले राजा,नाचे टाळ-विण्या संगे, नसे फिकीर जगाची,जरी पाऊस धारा ओथंबे! रूनझुन वाजे घुंगरमाळा,होई आरती ठाई ठाई, स्पर्श करी पालखीला,लहान पोरे,बाप्या अन बाई, पडे सडा रांगोळीचा,रस्त्यावरी जागोजागी, होई दर्शना गर्दी अफाट,जेव्हा घोडा धावे ग रींगणी! धरी फेर खाकिवाला,फुगडी घाले म्हतारबाबा, नाचे सारेच वारीला,लहान-थोर फेटेवाला! फिटे पारणे नेत्रांचे,जेव्हा दिसे सोन्याचा कळस, तुका,नामा,जनी,चोखा,भेटे हर एक श्वासात! तुळशीमाळ सजली ती,चंदन टिळा तो कपाळी, देव माझा कसा दिसे?जसा राजबिंडा ग हरी ! गर्जे आसमंत सारा,बळ येई भक्तांमधी, होई जल्लोष सुखाचा,भजे रामकृष्ण हरी! ©Nishigandha Kakade #वारी #पांडुरंग #दर्शन #विठ्ठल_रखुमाई
#वारी #पांडुरंग #दर्शन #विठ्ठल_रखुमाई
read moreShankar Kamble
पंढरीच्या वाटे!भार वैष्णवांचा! सोहळा सुखाचा! अनुपम!* माया मोह बंध! उतरले पार!* तरला सागर !जड जीवा!* देहाची ना शुद्ध! चित्त गुंतलेले!* नामात दंगले !रामकृष्ण!* *मुखी घेता नाम !शीण हा सरला! भरून उरला! देहांघटी!* सवे चालवितो !भार तो वाहतो!* नेत्रां दाववितो! पाप पुण्य!* ओढ अंतरीची !अंतराला ठावी!* गळाभेट व्हावी !मनीं आस!* *पायी लोटांगण !आसवे प्रक्षाळी! चरणे सावळी !विठुराया!* कंठ सद्गगदित !भाव ही खुंटले!* विकार लोपले! दर्शनाते!* ©Shankar Kamble #वारी #विठ्ठल_रखुमाई #विठ्ठल_विठ्ठल #वारी #वारी_आयुष्याची #दिंडी #पंढरपूर #विठ्ठल
Shankar kamble
*पंढरीच्या वाटे।धावे मन वेडे।* *संसाराचे कोडे।सोडवी तू।* *डोळा वाहे नीर।सुटलासे धीर।* *पाहण्या अधीर।सावळ्याला।* *बहु तापलो मी।संसार या तापे।* *जमविली पापे।नानाविध।* *नेत्रांची काहिली।तूच करी शांत।* *आता ना उसंत।क्षणभरी।* *चरणाशी मिठी।देवू अलिंगन।* *हृदयाची खूण।हृदयाला।* *गण गोत्र तोची।भीमा तटी उभा।* *चैतन्याचा गाभा।शोभतसे।* *पामर पतित।कैसा येवू पुढे।* *विषयां सवडे।निरवावे।* *पुण्याची शिदोरी।आज फळा* *आली।* *भेटाभेट झाली।पांडुरंगे।* *मागणें न काही।आता उरे काय।* *समरस साय।दुग्धासवे।* ©Shankar kamble #विठ्ठल #वारी #पंढरीचीवारी #विठू_माऊली #विठ्ठल_रखुमाई
#विठ्ठल #वारी #पंढरीचीवारी #विठू_माऊली #विठ्ठल_रखुमाई
read morerayansh
और कितनी दुरिया माऊली सहू मै तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै ll तू है कणकण मे, हर मन मे तूही तेरा जयघोष मुख मे, सुनले अनकही हरी नाम सुबह शाम, विठ्ठला हमराही रुहदारियोसे चलता रहु, राह दुरिया जितनी भी मेरी हर सiस, जिंदगी ए एहसास, मोहताज हू मै तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै ll मिलने की आस लिए, संग चले संग रुके, की तेरी वारी तुझ तक आते आते मन मंदिर हुवा, ये देह बना सवारी तेरा अधिवास मन मे, मर्माभास अर्पण मे, जीवन है पंढरी एक बारी दर्शन को तरसु, समा लू दिल मैं जिंदगी पुरी हर सफ़र का अंजाम तुम हो, आगाज भी तुमसे चाहु मै तेरी ऐसी नाराजगीसे नाराज हू मै ll Hopeful for next year's वारी 🙏🕉️🤞 #rayofhope #वारी #journeyoflife ©rayansh Hopeful for next year's वारी 🙏🕉️🤞 #rayofhope #वारी #JourneyOfLife
Hopeful for next year's वारी 🙏🕉️🤞 #rayofhope #वारी #JourneyOfLife
read moreShankar kamble
आसावला जीव।ओसंडला भाव। अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।। कातर मनाला।आठवं क्षणाला। काकडा ओवला।देहरूपी।।२।। मनं ओढावते।दर्शनांते आस। जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।। तोडीयले बंध।पाश मायारुपी। अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।। काय करू सांग।चित्त उसवले। पाहतो वाटुले।पंढरीची।।५।। अंतरी उमाळा।तोची घननीळा। सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।। नाद प्रसवला।परब्रह्म देहीं। मनाचियां डोही।नाद रंगे।।७।। देहादेही एक।भाव समरूप। पापांचे कळप।सुटती बां।।८।। मागणें न दुजें।आतां उरे काही। मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।। श्री. शंकर नागनाथ कांबळे ©Shankar kamble #वारी #विठ्ठल #पंढरपूर #माऊली #वारी_जांऊ #पांडुरंग #विठ्ठल_रखुमाई #सावळा
Lokesh Late
धन्य ते अरण रत्नाची ती खाण । जन्मला निधान सावता तो।। सावता सागर प्रेमाचे आगर। घेतला अवतार माळिया घरी।। धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता। साठविला दाता त्रैलोक्याचा।। नामा म्हणे ज्याचा जन्म सफळ झाला। वंश उद्धारिला माळियाचा।।. - संत नामदेव महाराज संत नामदेव महाराज #वारी #संत सावता महाराज