Nojoto: Largest Storytelling Platform

Best writersofpune Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best writersofpune Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

काव्यात्मक अंकुर

#परिचय #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #intropoem #marathipoems #poems #writing #marathiwriters #writersofpune #Introduction..✍🏻😇❤️🌱

read more
परिचय : अंकुर

उलटून गेल्या जरी साऱ्या वेळेच्या प्रहरी 
तरी वाढतात भावनांचे प्रवाह बनवतात शब्दलहरी
लागली साथ त्यांची जसजशी तशी वाढू लागली सोयरी
आलो नवकाळ घेऊन काव्यांचे, अंकुर मी हळूहळू चढेल ही पायरी

अंकुर होऊन मी पेरले बीज अंतरी
देऊन शब्दांना मोकळी भरेल मी पोकळी
वाटे आभाळ हे मोकळे अंकुर वाढवून घेईल भरारी
लावून लळा शब्दांना मी केली आहे भावनांशी लढायची तयारी

रुजवण्या खोल शब्द मी अंकुर गाठील तळ
नुसता थर न रचता वाढवत राहिलं नेहमी शब्दांचा स्तर
जरी अडकवून ठेवले शब्दांना भावनांनी लावून गळ
तरी मी साचा बनून उतरवेल त्यांना जशी लागे ओघळ

केलीय निश्चित ही मी पायाभरणी
होईल भरभराट बहर देऊन शब्दांना होईल काव्यांची उभारणी
भावनिक ओलावा देऊन सदा रचेल मी मांडणी
काव्यात्मकतेचे जीवन देत 'अंकुर' ला वाव देईल लेखणी

©अंकुर 
#काव्यात्मकअंकुर🌱 #परिचय #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #intropoem #marathipoems #poems #writing #marathiwriters #writersofpune #introduction..✍🏻😇❤️🌱

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile