Nojoto: Largest Storytelling Platform

Best रंग_प्रेमाचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रंग_प्रेमाचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 10 Stories

Ganesh Shinde

    🌈 रंग प्रेमाचे 🥳 #रंग_प्रेमाचे #yq_gns

Ganesh Shinde

वाटते इंद्रधनू घ्यावे,
माळावे तुझ्या केसांतुनी,
प्रेमच प्रेम तुझे-माझे 
बरसे सप्तरंगातुनी । ९ #रंग_प्रेमाचे #इंद्रधनू #yq_gns

Ganesh Shinde

ऐकना सखे एकदाच,
देऊया रंग तुझ्यातुनी,
काजळ काळ्या डोळ्यांचा,
दृष्टावो न प्रेम म्हणूनि । ८
 #रंग_प्रेमाचे #काळा #yq_gns

Ganesh Shinde

डुलती ते स्वर्णालंकार,
ल्यायली जे तू अंगभर,
त्याचाच रंग देऊया का,
येईल तेज निरंतर। ७ #रंग_प्रेमाचे #स्वर्ण #yq_gns
Image source : google

Ganesh Shinde

आकाश ठेंगणे वाटते,
मजला तुझ्या प्रेमापुढे,
अथांग आकाशी रंग तो,
पडती आनंदाचे सडे। ६ #रंग_प्रेमाचे #yq_gns #आकाशी

Ganesh Shinde

'हिरवा' रंग देऊया का,
कांकणं जी भरली हाती,
घुमते कानी किणकिण,
तुझाच भास करविती। ५ #yq_gns #रंग_प्रेमाचे #हिरवा
Image source : google

Ganesh Shinde

देऊया का रंग 'तांबडा',
नेसला जो शालू लग्नात,
काळजाचा रंग देऊनी,
लपवू का तुला मनात। ४ #yq_gns #रंग_प्रेमाचे #तांबडा
Image Source : google

Ganesh Shinde

म्हणावेच काय तुझ्या त्या,
अल्लड 'करड्या' बटांना,
नेमकी वेळ साधतात,
प्रेमात तुझ्या बुडताना। ३ #रंग_प्रेमाचे #yq_gns #करडा

Ganesh Shinde

रोजचे चोरून पाहणे,
केवढे ते तुझे लाजणे,
देऊ 'पिवळा' रंग त्याला ,
हळद लागल्या हाताने। २ #रंग_प्रेमाचे #पिवळा #yq_gns

Ganesh Shinde

कोणता रंग द्यावा सखे,
सांगना तुझ्या माझ्या प्रेमा,
'गुलाबी' गोड दिवसांच्या,
प्रेमात बुडत्या क्षणांना। १ #रंग_प्रेमाचे #गुलाबी #yq_gns
loader
Home
Explore
Events
Notification
Profile