Nojoto: Largest Storytelling Platform

Best गौरीहर्षल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गौरीहर्षल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 56 Stories

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, 
मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. 
स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. 
पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, 
देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. 
वेळ सतत दाखवून देत असते की 
माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. 
ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही 
आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. 
बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.  #yqmarathi 
#yqquotes 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

बदलतात ती माणसं 
आणि 
दोष मात्र वेळेला दिला जातो. #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

इथे लोकांना माणसं 
कायमची वर गेलेली चालतात पण 
आपल्यापेक्षा वरचढ झालेली चालत नाहीत. 
#कटू_सत्य

#स्वतःला_शोधताना_गौरीहर्षल #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

माझ्यात आणि तुझ्यात 
एक फरक आहे खास
मी आहे अनुभवता येणारं अस्तित्व 
तू आहेस निव्वळ एक भास #मराठी
#मराठीकविता
#मराठीचारोळी
#yqmarathi
#yqquotes
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल       #paidstory

gauri kulkarni

देवाचं अस्तित्व आणि आपल्याकडून झालेली चूक 
ह्या गोष्टी पूर्णपणे आपल्या मानण्यावर अवलंबून असतात. 
दुर्दैवाने दोन्ही गोष्टी मान्य तेंव्हाच केल्या जातात 
जेव्हा त्यामुळे आपला फायदा होणार असतो. 
#sad_but_true
 #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

लाखमोलाची माणसं 
लाभणारं माणूस असतं लकी
आयुष्यभर जपावी अशी 
माणसं आणि नाती पक्की #असंच_सुचलेलं
#स्वतःला_शोधताना
#गौरीहर्षल

gauri kulkarni

उगाच कशाला अडकायचं 
कुणाच्या शब्दांत???
खरी भावना उमटत असते 
बोलणाऱ्याच्या डोळ्यात #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

तुम्हाला काय वाटतं
हे इथे कुणी बघत नसतं
जगाच्या खोट्या दिखाव्यालाच तर 
आपलं मन फसत राहतं #गौरीहर्षल 
#असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना

gauri kulkarni

साधं सोपं संभाषण 
हल्ली कुणासोबतच होत नाही
स्वतःचे टेन्शन्स सांगितल्याशिवाय 
कुणाचंच मन भरत नाही #असंच_सुचलेलं 
#स्वतःला_शोधताना 
#गौरीहर्षल

gauri kulkarni

गॉसिप केल्याशिवाय काही 
मनाला चैन पडत नाही 
आणि
"जाऊदे, आपल्याला काय त्याचं",
असं म्हटल्याशिवाय गॉसिपला रंग चढत नाही.  #गौरीहर्षल 
#स्वतःला_शोधताना 
#असचं_सुचलेलं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile