Find the Best विठुमाऊली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutविठुमाऊली तू माऊली जगाची लिरिक्स, विठुमाऊली तू माऊली जगाची, विठुमाऊली हाचि वर देई, विठुमाऊली फोटो, विठुमाऊली मालिका,
शब्दवेडा किशोर
#सावळा तो विठुराया माझा.... सावळा तो विठुराया माझा जागोजागी तयाचा मज होई भास मन होई लगेचच कासावीस लागे तयाच्या दर्शनाची आस निवृत्ती,ज्ञाना,सोपान,मुक्ताई, एकनाथ,नामदेव,तुकाराम नामाची पालखी पंढरीस निघाली झांज,चिपळ्या,टाळ,विणा अन् मृदंगाच्या जयघोषाने पंढरीतली भिमा अन् चंद्रभागाही सुखावली वायूवेगाने अश्व माऊलीचे जेव्हा धावे अंगी त्याच्या तेव्हा नवचैतन्य साचे टाळ मृदुंगाच्या जयघोषात रिंगणी माझा वारकरी विठ्ठल नामात दंग होऊनीया नाचे युगे अठ्ठावीस तो देव माझा आहे उभा विटेवरी रूप गोजीरे तयाचे साजे तो आहे भक्तकैवारी असा नसे ज्ञानियांचा राजा सकळ श्रीमंत दुजा या भु-वरी @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #विठुमाऊली
शब्दवेडा किशोर
एकच भिती वाटते विठुराया संसारसागरी पोहताना एक दिवस अचानक तुटेल माझ्या श्वासांची दोरी अन् मग घडणार नाही रे मग परत कधीच तुझ्या पंढरीची वारी माझ्या डोळ्यातील आसवं तेव्हा सुद्धा देवा तुच अलगद् पुसले अन् तुझ्याही डोळ्यात मज तेच आसवं अनाहुत क्षणी जाणवले माझ्या डोईवर हात ठेवून तेव्हा मजला देवा तु म्हणाला संसार सोडू नकोस फक्त एक कर तुझ्या श्वासाच्या दोरीवर माझं नाव झुलत ठेव अन् चित्ताच्या पटलावरती सावळं मनोहर माझं रूप सतत फुलत ठेव देईन तुजला सतत दर्शन मी करीन तुझी सफल प्रत्येक वारी देईन मोक्षवरदान तुजला तेव्हा जेव्हा असशील तु मृत्यूच्या दारी ©शब्दवेडा किशोर #विठुमाऊली
शब्दवेडा किशोर
पांडूरंग म्हणजे वारकर्यांच्या गळ्यातली तुळशीची माळ पांडूरंग म्हणजे रखुमाईचं कुकंवानं मळवटलेलं कपाळ पांडूरंग म्हणजे भक्त पुंडलीकाने फेकलेल्या विटेवर अठ्ठावीस युगं जगउद्धारासाठी उभा असलेला अनंत काळाचा देव पांडूरंग म्हणजे तुकोबारायाच्यां अभंगातला टाळ पांडूरंग म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भक्तीच्या नांगराला सोन्याचा फाळ पाडूरंग म्हणजे कायम आठवणीतले भक्तीमय छत्र पांडूरंग म्हणजे संतमहंतांचा सुवर्ण आयुष्यकाळ वारकर्यांकरीता हिरवागार झालेला रानमाळ पांडूरंग म्हणजे वारकर्यांच्या गळ्यात स्थिरावलेली सोन्यापेक्षाही श्रेष्ठ तुळशीची माळ पांडूरंग म्हणजे वारकर्यांना स्वप्नात भासलेला जन्मोजन्मीचा सुवर्णमय सुखबरसातीचा काळ पांडुरंग म्हणजे हरीभक्तांचा अविट असा जागर पांडुरंग म्हणजे मायेचा पाझर पांडुरंग म्हणजे तिन्ही जगाचे खरे सार पांडुरंग म्हणजे वारकऱ्यांचे खरे अस्तित्वरूपी माहेर अन् सासर ©शब्दवेडा किशोर #विठुमाऊली
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited