एकच भिती वाटते विठुराया संसारसागरी पोहताना एक दिवस अचानक तुटेल माझ्या श्वासांची दोरी अन् मग घडणार नाही रे मग परत कधीच तुझ्या पंढरीची वारी माझ्या डोळ्यातील आसवं तेव्हा सुद्धा देवा तुच अलगद् पुसले अन् तुझ्याही डोळ्यात मज तेच आसवं अनाहुत क्षणी जाणवले माझ्या डोईवर हात ठेवून तेव्हा मजला देवा तु म्हणाला संसार सोडू नकोस फक्त एक कर तुझ्या श्वासाच्या दोरीवर माझं नाव झुलत ठेव अन् चित्ताच्या पटलावरती सावळं मनोहर माझं रूप सतत फुलत ठेव देईन तुजला सतत दर्शन मी करीन तुझी सफल प्रत्येक वारी देईन मोक्षवरदान तुजला तेव्हा जेव्हा असशील तु मृत्यूच्या दारी ©शब्दवेडा किशोर #विठुमाऊली