Find the Best vitthalrakhumai Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
GANESH EDITZ
*ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,* *वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!* _पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळाकडे आस लावून बसलेल्या बांधवरील शेतकऱ्यांना आणि विठुरायाच्या दर्शनाने सुखाचा सोहळा साजरा करणाऱ्या तमाम जनतेस आषाढी एकादशी निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!_ #vitthal #vitthalrakhumai #vitthalbhakti nojoto❤ Love #nojotonews #ganesh_pakere_editz love❤ #Culture
read moreprayag pawar
पंढरीच्या विठ्ठला एक म्हणणं ऐक ना यावेळी नाही जमलं पंढरीला यायला सांग तूच येशील का माझ्या भेटीला? का कोणाला तरी पाठवशील न्यायला? थकला बघ जीव माझा आता विझल्या डोळ्यांना वाट दिसेनाशी झाली आषाढी एकादशी काही क्षणांवर ठेपली अन् क्षणोक्षणी आठवण तुझी मला आली तुझ्या दिंड्या पालख्या बघतो मी जेव्हा आतूरता तुझ्या ओढीची छळते मला दुरूनच होतो नतमस्तक तुला अन् तुझी अगाध किमया कळते मला उभा जनसमुदाय लोटेल तुझ्या दर्शनाला मी मात्र इथेच असेन अंथरुणाला खिळून कर कठेवरी ठेवूनी अखंड समोर बघणारा तु माझ्यासाठी एकदा पाहशील ना मागे वळून प्रयाग पवार ©prayag pawar #vitthalrakhumai
Shantanu Kolekar
आषाढ माहिना येता विठुवारीची चाहूल लागली दिंडीला जाण्याची इच्छा मनी प्रकट झाली ललाटी लावुनी चंदन हाती घेतला मृदुंग तुळशीच्या सुवासात मन झाले हे दंग चाललो वारी होई विठुनामाचा गजर चंद्रभागेच्या तीरावरील पंढरपूरासी नजर आसुसलेले डोळे घेवुनी आले आहेत वारकरी दर्शन देण्यास सज्ज माझा विठु विठेवरी घरी आल्यानंतरही विठुरायाची आठवण आली आई बापाकडे पाहता विठु रखुमाईची प्रचिती आली - शंतनू कोळेकर ©Shantanu Kolekar #vitthalrakhumai #pandharpurvari
#vitthalrakhumai #pandharpurvari
read moreShreyas Gawde
देवशयनी आषाढी एकादशी आज पहिल्यांदा रखुमाईने संसाराच्या कारभारात सुटकेचा हुश्शहह सोडला असावा... तरीपण विठूचा चेहरा पाहून तिला सुद्धा आज भरल्या डोळ्यात, वारकऱ्यांनी भरलेला गाभारा आठवत असावा. . . आज विठ्ठलरखुमाई चं सुद्धा देहभान भक्तांच्या आठवणीत हरपत असावं. . . जीव लावावा तर असा. . .😢 🙏🙏🙏🙏🙏 💫-✍️श्रेयस गावडे©® #Art #creater #God #vitthalrakhumai
#Art #creater #God #vitthalrakhumai
read more