Nojoto: Largest Storytelling Platform

Best अभंगवाणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best अभंगवाणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories

Sachin Zanje

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद.
       कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ ||

चंदनाचा ऐसा पितपिंताबर
           चंदनाचे कर , कटावर    ||१||

चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी 
       घननिळरंगी , रंगोनिया...||२||

चंदनाचे बन ऐसा तो सुगंध..
          येई मंद मंद , परिमळ..||३||

म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन..
झिजविण्या तन , तुम्हालागी..||४||

गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी.

रचना :-संतश्रेष्ठी  कैकाडीबुवा

©Sachin Zanje #अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.

Shankar kamble

*तत्वज्ञान सार।आयुष्याचे सोपे।* 
 *उपकारा तापे।तोची धन्य।* 

 *दुःखाला फुंकर।मायेची झालर।* 
 *दुबळ्याला धीर।होय खरा।* 

 *भुकेलेल्या घास।तहानेल्या नीर।* 
 *रहावे खंबीर।सत्यमार्गी।* 

 *साऱ्यांप्रती मनीं।जपा प्रेमभाव।* 
 *किल्मिषाचे डाव।उलथावे।* 

 *काम, क्रोध रिपू।जाळावे अंतरी।* 
 *निर्मळ उदरी।गंगाजळे।* 

 *कष्टाची भाकरी।नको लाचखोरी।* 
 *असावी पदरी।रूपे चार।* 

 *मृदू वाचा मुखी।नीतं नम्र वदे।* 
 *पावन ती पदे।त्रैलोक्यात।* 

 *निरवावे मनं।सज्जनाची खूण।* 
 *आपला तो जाण। म्हणा सदा।* 

 *भंगुर जीवनी।शाश्वत हे सुखं।* 
 *उल्हासित मुख।स्वकारणे।* 

 *रीते हाती आलो।रितेच जायचे।* 
 *कस्तुरी गंधाचे ।प्रेम ठसे।*

©Shankar kamble #अभंग #संत #रचना #अभंगगाथा #अभंगवाणी 

#Butterfly

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile