Find the Best अभंग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआपुला तो एक अभंग, जलाविण मासा अभंग in marathi, नाम पर अभंग, तो गणराज गणपती अभंग, अवघा तो शकुन अभंग,
Mohan Somalkar
*भा. सा. व सांस्कृतिक मंच नागपूर आयोजित काव्य लेखन उपक्रम* *काव्य प्रकार _अभंग लेखन* *विषय _दिनू सोनियाचा* आळंदी देवाची/ संजीवन धाम / घेत हरिनाम/ ज्ञानेशाचे//१ वद्य त्रयोदशी /दिनू सोनियाचा/ कार्तिक मासाचा/समाधीचा//२ इंद्रायणी काठी/ उत्सव चालला/ भक्तांचा लोटला/ महापूर//३ ज्ञानदेवा दिली /भाषेची मराठी/ सर्व जनासाठी/ ज्ञानेश्वरी//४ साहित्य महंत/ सामर्थ्य भाषेचे / रुप लालित्येचे / दावियले//५ पसायदान हे/ विश्व कल्याणासी/ हेच देवापाशी/ मागितले //६ ज्ञानाची महती / ज्ञानेश्वरी जशी/ चौदाव्या त्या वर्षी/ पुर्ण केली//७ विठ्ठल दैवत / गुरु हे निवृत्ती/ जागवी प्रवृत्ती/ त्यांचे ठाई //८ विचार ज्ञानाचे/ करु अवगत/ प्रकाश सांगत / महतीचे //९ डॉ.प्रकाश पांडे वाशीम ©Mohan Somalkar #अभंग
Mohan Somalkar
लावियल्या ज्योती (अभंग) लावियल्या ज्योती ॥ डोळ्यात भक्तीच्या॥ हरी भजनाच्या ॥ पांडुरंगा॥१॥ आळवितो तुला ॥ भक्तीत रंगतो॥ अभंगातुनि गातो॥ नाम तुझे॥२॥ दया, क्षमा,शांती ॥ तुझ्या ठायी भेटे॥ चित्त शांत वाटे ॥ तुझ्या ठायी॥३॥ नको राग -द्वेष ॥ नको मनी क्रोध ॥ भजनातुनी बोध ॥ घेऊ दे रे॥४॥ मन माझे लागे ॥ धावे तुझ्याकडे॥ गावया आवडे॥ गीत तुझे॥५॥ हरी मुखे म्हणा॥ झेंडा हाती धरा॥ पहाट प्रहरा ॥ नाम घ्यावे॥६॥ एक तरी ओवी॥ रोज म्हणा घरी॥ हरीपाठ दारी॥ नित्यदिनी॥७॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #अभंग
Mohan Somalkar
लावियल्या ज्योती लावियल्या ज्योती ॥ डोळ्यात भक्तीच्या॥ हरी भजनाच्या ॥ पांडुरंगा॥१॥ आळवितो तुला ॥ भक्तीत रंगतो॥ गीतातुनि गातो॥ नाम तुझे॥२॥ दया, क्षमा,शांती ॥ तुझ्या ठायी भेटे॥ चित्त शांत वाटे ॥ तुझ्या ठायी॥३॥ नको राग -द्वेष ॥ नको मनी क्रोध ॥ नामातुनी बोध ॥ घेऊ दे रे॥४॥ मन माझे लागे ॥ धावे तुझ्याकडे॥ गावया आवडे॥ गीत तुझे॥५॥ हरी मुखे म्हणा॥ झेंडा हाती धरा॥ पहाट प्रहरा ॥ नाम घ्यावे॥६॥ एक तरी ओवी॥ रोज म्हणा घरी॥ हरीपाठ दारी॥ नित्यदिनी॥७॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #अभंग
Mohan Somalkar
अभंग जय शिव शंभो॥ उमापती देवा॥ नाम तुझे घ्यावा॥ हर व्यक्ती॥१॥ कृपावंत देव॥ महादेव म्हणा॥ नित्य आराधना ॥ त्याची करु॥२॥ जगजेत्ता भोले॥ डमरुवर डोले॥ प्रसन्नच झाले ॥ मनमाझे॥३॥ वाहे बेल पत्री॥ नमीतात त्याला॥ जो विषाचा प्याला॥ नीलकंठ ॥४॥ मोहन सोमलकर, सुप्रभात ©Mohan Somalkar #अभंग #sunflower
Mohan Somalkar
पहाट पुष्प ( अभंग) माता शारदिये॥ नमो नमो माता॥ ठेवितो मी माथा॥ चरणिया॥१॥ जय महालक्ष्मी॥ कोल्हापूरी वसे॥ रुप तुझे दिसे॥ तेजोमय॥२॥ जय माॅ रेणुका॥ गड त्या माहुरी॥ ती डोंगरदरी॥ वेढलेली॥३॥ जय माॅ भवानी ॥ तुळजापुरची॥ तु शिवरायांची॥ आद्यदेवी॥४॥ जय महालक्ष्मी॥ नागपुर क्षेत्री ती॥ तुझी असे ख्याती॥ वरदेई॥५॥ आगारामदेवी॥ जागृत असशी॥ भुमी पुत्री जशी॥ प्रकटली॥६॥ हरऐक स्थळी॥ तिचे वस्तीस्थान॥ देवादिकां मान॥ सदा मिळे॥७॥ मोहन सोमलकर 🌿🌿🌿🌷 ©Mohan Somalkar #अभंग
Mohan Somalkar
मन माझे धुंद ॥ आत्मा हा मिलिंद ॥ लागला हा छंद ॥ गीत गाण्या॥१॥ गुरुवर्य माझे॥ कुठे ठाव नाही ॥ फिरे दिशा दाही ॥ मन माझे॥२॥ ह्दयात बसली॥ मूर्ती त्या गुरुंची॥ लाभे ती दयेची ॥ प्रतिभा ती॥३॥ येती समीप ते॥ गुरुवर्य माझे॥ कमी होई ओझे॥ मनाचे या॥४॥ मोहन सोमलकर ©Mohan Somalkar #अभंग
Mohan Somalkar
आषाढी एकादशी भक्त करिती वारी वाट चालती पंढरी आवडीने...! मोहन म्हणे आता मिडीयातही देव वसला प्रत्येक मोबाईलात विठुराया हसला......! तुका पाहती वरुन पुष्पक विमान पाठवितो खाली शिकवितो अभंग या त्यात बसुन.! असेल आवड श्री विठ्ठलाची मग कशास बाळगता भिती मरणाची...! निसंदेह, निर्मोही भक्ती करा स्वतःला पायरीत करा अर्पण नका चित्त ठेवा आपुले खेटरात..! काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल दोन्ही निरंतर हेची सर्व सुख...! मोहन सोमलकर नागपुर 🚩🚩🚩🎋 ©Mohan Somalkar #अभंग