Nojoto: Largest Storytelling Platform

Best माझं_आभाळ_अगाध Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माझं_आभाळ_अगाध Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

शब्दवेडा किशोर

#माझे मत..
माझे मत शब्दात नाही सांगता येणार अन्
सहजासहजी ते कुणाला चेहऱ्यावरूनही नाही कळणार
ते अलगदपणे डोळ्यातुन तु समजुन घेशील ना..
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला कायम तु देशील ना...
माझ्याही नकळतपणे दुखावले मी तुला तर माफ सदा तु मला करशील ना...
ओघळले जरी कधी गाली अश्रु माझे तर अलगद ते तु टिपून घेशील ना..
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना..
जेव्हा सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना..
चुकतोय मी असे वाटले जर कधी तर हक्काने मला सांगशील ना..
हरवलो मी कुठे कधी जर सावरून तु मला घेशील ना..
कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना..
मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना..
इरेला पेटलाय हा जीव तुजसाठी माझा गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना..
मला तुझी गरज आहे हे न सांगता ओळखशील ना..
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो पण
माझ्यासाठी एवढे एक करशील ना..
तुझ्यासाठी जरी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी कायम फक्त 
तूच एक माझ्यामध्येच माझ्याशीच माझ्यासाठीच
एकरूप होऊन जगशील ना..??
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझं_आभाळ_अगाध

शब्दवेडा किशोर

मन हळवं असावं
पण दुबळं
नसावं..
कारण हळव्या मनास
भावना कळतात 
तर
दुबळ्या मनास मात्र
सतत फक्त
वेदना छळतात

©शब्दवेडा किशोर #माझं_आभाळ_अगाध

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile