Find the Best माणूसम्हणूनजगताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shankar Kamble
मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे... नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी... रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी... कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे... उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला... एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे... ©Shankar Kamble #माणूस #माणूसम्हणूनजगताना #जीवन #लढा #जगणं #अस्तित्व #प्रेम #चिंतन
Shankar Kamble
हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते सर नव्हती पावसाची आभाळ भिजले होते.. भणंग जिंदगीची वणवण कशास सोसू? खंजीर खुपसले पाठी कट मागे शिजले होते.. खोल गेले पोट त्यांचे, त्यांचा झालासे नगारा ते शांत साखर झोपी कुणी तसेच निजले होते.. फुंकतेस कशाला?चुल आहे पेटलेली नजरेत भूक जळते अंगार विझले होते.. शाप दे वा वर दे सोय तुझी तू पाहून तुजं कैद मंदिरी केले मी मनांत पुजले होते.. गाढलेला उकरून पुन्हां देह बाहेर काढला सापडेना माणूस कुठे माणूसपण कुजले होते.. डोके गहाण ठेवून विकतो मलाच आता बोली लावण्यास कैक दलाल जमले होते.. फोडून खापर माझ्यावर जो तो धन्य होतो मूढ मती मी उशीरा गमते काय चुकले होते.. ©Shankar Kamble #Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ
#Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ
read moreRashmi Hule
माणुसकीचा ध्यास हवा नात्यांचा सहवास हवा सहवासामध्ये विश्वास हवा गवसेल जगण्यास मग अर्थ नवा. Taai ka vishay:- Insaan banake jite hai tab... Meaning :- Insaiyat ka dhyas hona chahiye. Rishtonka sahvas hona chahiye Sahavas me vishavas hona chahiye Fir jindagi ko ek naya andaaj Prapt hoga.
Taai ka vishay:- Insaan banake jite hai tab... Meaning :- Insaiyat ka dhyas hona chahiye. Rishtonka sahvas hona chahiye Sahavas me vishavas hona chahiye Fir jindagi ko ek naya andaaj Prapt hoga.
read morevaishali
माणूस म्हणून जगताना हिम्मतीने जगायला शिक माणूस म्हणून जगताना सुखदुःख भोगायला शिक माणूस म्हणून जगताना हार जीत पचवायला शिक माणूस म्हणून जगताना जिद्दीने कष्ट करायला शिक माणूस म्हणून जगताना संकटांना सामोरे जायला शिक माणूस म्हणून जगताना माणसात माणसासारखं वागायला शिक सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा सुंदर विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे माणूस म्हणून जगताना... #माणूसम्हणूनजगताना हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा सुंदर विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे माणूस म्हणून जगताना... #माणूसम्हणूनजगताना हा विषय
read moreyogesh atmaram ambawale
माणूस म्हणून जगताना माणुसकीला धरूनच चालावे. कुठलेही क्लेश मनात न ठेवता, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे,प्रेमाने वागावे. अडला असता कुणी,मदतीचा हात द्यावा, कुठलेही कार्य करता स्वार्थपणा नसावा. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा सुंदर विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे माणूस म्हणून जगताना... #माणूसम्हणूनजगताना हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा सुंदर विषय घेऊन मी परत आलीय. आजचा विषय आहे माणूस म्हणून जगताना... #माणूसम्हणूनजगताना हा विषय
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited