Nojoto: Largest Storytelling Platform

Best गूढ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गूढ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutगूढ़ विद्या क्या है, गूढ़ विज्ञान meaning in hindi, गूढ के फायदे, गूढ़ का अर्थ, गूढ ज्ञान,

  • 3 Followers
  • 3 Stories

Shankar Kamble

हुंदक्यात आयुष्याचे गाणे सजले होते
सर नव्हती पावसाची आभाळ भिजले होते..

भणंग जिंदगीची वणवण कशास सोसू?
खंजीर खुपसले पाठी कट मागे शिजले होते..

खोल गेले पोट त्यांचे, त्यांचा झालासे नगारा
ते शांत साखर झोपी कुणी तसेच निजले होते..

फुंकतेस कशाला?चुल आहे पेटलेली
नजरेत भूक जळते अंगार विझले होते..

शाप दे वा वर दे सोय तुझी तू पाहून
तुजं कैद मंदिरी केले मी मनांत पुजले होते..

गाढलेला उकरून पुन्हां देह बाहेर काढला
सापडेना माणूस कुठे माणूसपण कुजले होते..

डोके गहाण ठेवून विकतो मलाच आता
बोली लावण्यास कैक दलाल जमले होते..

फोडून खापर माझ्यावर जो तो धन्य होतो
मूढ मती मी उशीरा गमते काय चुकले होते..

©Shankar Kamble #Light #जिंदगी #जीवन #जीवनअनुभव #जगणे #माणूस #लढा #माणूसम्हणूनजगताना #फासा #गूढ

Abhishek Panchal

गूढ रहस्य आहे आयुष्य
कोणाचं हासू , कोणाचे रडणे
कशामागे काय दडलं असेल
काहीच सांगू शकत नाही #आयुष्य #गूढ #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes

Santosh Jadhav

#dilbechara #गूढ गूढ....! हा नजराणा कि नजरेची कलाकारी... हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!

read more
गूढ....! 

हा नजराणा कि नजरेची कलाकारी...
हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...! 

मी तुला चोरून पाहतोय हे हेरून तू होते बावरी... 
तू हलकेच वळून पाहत घाव घालतेस काळजावरी..! 

मी हरलो कि हरवून गेलो कळेना मला सुंदरी... 
मी भरुन पावलो कि भरकटून गेलो तुझ्या आहारी..! 

वाऱ्यावर केसांची तुझ्या हलचाल ती होणारी... 
कि हृदयावर माझ्या ती बट चाल करून येणारी..! 

जीव गेला मात्र जीवंतपणाची जाणीव उरी... 
बेसावध सावज मी अन् तू सावध शिकारी...! 

ते गूढ हास्य पाहून तुझ्या ओठांवरी... 
वाहावत जाणारा मी पुन्हा येतो काठावरी...! 

ना भाव तुझा,ना ठाव तुझा कळला मला आज जरी 
फिरूनी पुन्हा येईन मी फिरतो आता भले माघारी..! 
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #dilbechara
#गूढ

गूढ....! 

हा नजराणा कि नजरेची कलाकारी...
हि तुझी अदाकारी की अदांची दादागिरी...!

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile