Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवणींचापसारा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवणींचापसारा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 8 Followers
  • 15 Stories

शब्दवेडा किशोर

#मी आहे ना..Every thing will be fine....
  आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात.प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते ? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी.आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे..रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं.It's mutual relation..
मन जुळलं की आपलेपणाचं नातं तयार होतं.     
      जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कुणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत
कधीच तुटत नाहीत.आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे "मी आहे ना" शब्द संजीवनी सारखे काम करतात.अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं आणि मेन म्हणजे या जगात पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे अन् नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण....
बरोबर आहे ना....??

@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आठवणींचापसारा

शब्दवेडा किशोर

#आठवणींचे तराणे....
स्मृती तुझ्या रात्रंदिनी सलतसे इथं माझ्या मनी
आठवते मग आठवण ती सुखाची तुझ्या माझ्या प्रितरंगाची
सांजवेळी ओलेत्या नदीतीरावरी जागवल्या मी स्मृती माझ्या ऊरी
स्मृती तुझी जेव्हा जागवली हृदयी तेव्हा नेत्रकडा माझी अनाहुतपणे
पाणावली....
स्मृतीमध्ये तुझ्याच जेव्हा जगतो रमतो अन् दंगतो मी
तेव्हा सुखावितो सदा माझ्या जिवा आठवण तुझी जेव्हा येते मज
मन माझे वेडे तेव्हा होते कधी पुन्हा भेट तुझी माझी होते 
मग तेव्हा मन माझे भारावते....
सये तुझ्या प्रेमाची जुनी एक आठवण येता होई प्रितगंधाची मनी साठवण 
रात्री स्वप्नं जेव्हा मजाला पडे त्यातही मग दिसे मला तुच गडे
नाही आता मज करमत मन बसे तुज सदा आठवत 
घडलेले ते क्षण मग आठवून मी मना घेतसे रमवून 
मला तुझा असे सदा अभिमान झालीस माझ्या जीवनाची तु शान
आता एकच ईच्छा माझी सदा असे मनोमनी भेट व्हावी पुन्हा तुझी
अन् जगावे मी पुन्हा नव्यानं क्षणोक्षणी संगती तुझ्या
अंतर नसावे तेव्हा तुझ्या माझ्यात हृदयी मी जगावे अन्
तुझ्या अंतरीचा बहर बनुनी सदा तुझ्या आयुष्यात उरावे....
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आठवणींचापसारा

शब्दवेडा किशोर

वेडावल्या मनी ही वेडावली प्रीत आहे
सरले वय तरीही आठवणीत तुझी रीत आहे....
गात होतीस सखे जीवनात तू नेहमी बेसूरे हे गाणे
बेसुरे गाणे तुझे ते आता माझे गीत आहे....
तुच सखे होतीस या अव्यक्त मनाच्या व्यक्त भावना
आजही तुच माझ्या जगण्याची आकृती आहे....
तुच होती दिशा माझी
आज माझी दशा ही तुच आहे....
तुझ्या माघारी ठेवलेल्या आपल्या प्रीतवेड्या 
त्या आयुष्यातील घालवलेल्या क्षणांचा
प्राजक्तदरवळ मी कायम जपतो आहे....
तुझ्या आठवणीच्या रस्त्यावर आजही
एकटा प्रवासी मी दिगंताचा
युगे-युगे माझी वाट चालत आहे....
तुझ्या दिलेल्या आठवणी मजला मयुरपंखासम आहे
आजही मजवर सये तुझ्या सोनेरी क्षणांनी
भारलेली सुखबरसात आहे....

©शब्दवेडा किशोर #आठवणींचापसारा

शब्दवेडा किशोर

तुझी आठवण मला परत त्या शालेय जीवनात घेऊन जाते अन्
नव्यानं जुन्या प्रेमाची आठवण करून देते तुझी आठवण
मजला सखे जगण्याची नवी उर्मी देते....
ते आपलं एकमेकांकडे चोरून बघणं
अन् अनाहुतपणे काही क्षण मग सारं काही विसरून
एक वेगळंच आयुष्य जगणं
आज ते आठवताना माझ्या डोळा अलगद् पाणी येते
अन् तुझी आठवण मजला सखे जगण्याची नवी उर्मी देते....
कधी कधी वाटतं पूर्णपणे तुझ्यातंच सामावून जावं
अन् फक्त तुझ्यात रमुन जावं
सारी काही आठवलं की डोळ्यासमोर ते क्षण अन्
तीच जुनी कहाणी नव्यानं उभी करून जाते
अन् तुझी आठवण मजला सखे जगण्याची नवी उर्मी देते....
खरं प्रेम अन् खोटं आयुष्य यातील बॕलेंस मज कधी जमलाच नाही
असाच अचानक जाताना फक्त नावाला तुझ्यापासून दूर गेलो खरा
पण तद्नंतर माझं मन कशातंच रमले नाही 
आज मजला परत नव्याने प्रेमात पडायचं आहे
फक्त तुझ्यासाठी बेभान होऊनी पुन्हा जगायचं आहे
तुझ्या आठवणी कायमच हृदयात ठेवायच्या आहेत
तुझ्या हृदयीच्या गुजगोष्टी माझ्या हृदयी जपायच्या आहेत 
अन्
म्हणूनच तर सांगतो सखये एकदा मजसाठी जरा चार पावलं मागे ये
मनभरून तुजला डोळ्यात जपायचं भाग्य पुन्हा मज लाभु दे
तु नसताना तुझ्या आठवणींना घेऊन सोबती
पुढं जायची हिंमत मज नियती देते
अन् खरं सांगतो ऐक पुन्हा
तुझी आठवण मजला सखे जगण्याची नवी उर्मी देते 
जगण्याची नवी उर्मी देते....

©शब्दवेडा किशोर #आठवणींचापसारा

Kunal Salve

छान केलंस मला सोडून जर,
लग्नानंतरही आठवण माझी कशी आली 
आहेस सुखी त्याच्या सोबत तर,
फोन करून एका हॅलो साठी का दुःखी झाली ?  #दुरावा 
#प्रेम 
#आठवणींचापसारा 
#फोन

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मित्रानों आजचा विषय आहे विषय - "आठवणींचा पसारा" #आठवणींचापसारा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
आठवणींचा पसारा असेलच तुझ्याकडे
समोर माझ्या कधीतरी आवर्जून आवर 
अजून पसारा जर झाला त्यांचा तर 
जरा प्रेमानं मला अलगद मिठीत सावर !  सुप्रभात मित्र आणि मित्रानों
आजचा विषय आहे

विषय - "आठवणींचा पसारा" 
#आठवणींचापसारा

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Rashmi Hule

#आठवणी#शुभेच्छा सुप्रभात मित्र आणि मित्रानों आजचा विषय आहे विषय - "आठवणींचा पसारा" #आठवणींचापसारा

read more
काही नाती फार 
सुंदर असतात
खूप जवळची आणी 
पवित्र असतात
मग अचानक कधी 
काय होते समजत नाही
ताणली जातात, अंतरतात 
अनोळखी... ओळखी... 
परत एकदा... अनोळखी होतात...
आठवणींच्या पसार्‍यात
 कायम राहतात.. 
मनोमन शुभेच्छा आणी 
आशिर्वाद देत राहातात.. 

 #आठवणी#शुभेच्छा 

सुप्रभात मित्र आणि मित्रानों
आजचा विषय आहे

विषय - "आठवणींचा पसारा" 
#आठवणींचापसारा

Vinod Umratkar

कोपऱ्यात मनाच्या माझ्या
तुझी जागा ठेवलीय राखून।
आठवणी प्रेमाच्या तुझ्या
आहे सखे, सुरक्षित साठवून। #आठवणींचापसारा
 #आठवणींची_साठवणं 
#मराठीलेखणी 
#yqtaai 
#yqmarathi 
#mywordsmythoughts  #YourQuoteAndMine
Collaborating with Komal 😊

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मित्रानों आजचा विषय आहे विषय - "आठवणींचा पसारा" #आठवणींचापसारा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
आठवणीचा पसारा
दरवळू लागला तसाच
किती क्षण माझे तुझे
त्यात प्रेमाचे होते गुतले तिथे
त्या आठवणीच्या आकंठात 
सरकन जणू येतात 
चेहरे जेव्हा दिसतात तूझ्या सारखे
मला भासवणारे...


 सुप्रभात मित्र आणि मित्रानों
आजचा विषय आहे

विषय - "आठवणींचा पसारा" 
#आठवणींचापसारा

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.

Atul Waghade

सुप्रभात मित्र आणि मित्रानों आजचा विषय आहे विषय - "आठवणींचा पसारा" #आठवणींचापसारा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.

read more
आठवणीचा पसारा
दरवळू लागला तसाच
किती क्षण माझे तुझे
त्यात प्रेमाचे होते गुतले तिथे
त्या आठवणीच्या आकंठात 
सरकन जणू येतात 
चेहरे जेव्हा दिसतात तूझ्या सारखे
मला भासवणारे...


 सुप्रभात मित्र आणि मित्रानों
आजचा विषय आहे

विषय - "आठवणींचा पसारा" 
#आठवणींचापसारा

चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile