Nojoto: Largest Storytelling Platform

Best Ekpanati Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best Ekpanati Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutekp login, poetry on ana parast, anātman is generally referred to as what, how to fast pro ana 10, anāthālaya in hindi,

  • 1 Followers
  • 1 Stories

Pandit Nimbalkàr

*एक पणती*

दारात झोपडीच्या,
एक पणती मिणमिणती 
हलकेच झोके घेत, 
सुख प्रकाशाचे उधळीत,
वाट दावते आयुष्याला ||१||

फाटक्या रांगोळीची
पायघडी उभी स्वागताला 
अस्ताव्यस्त संसाराची 
रेखाटलेली छबी जणू 
मांडलेली जाणत्याने ||२||

तिखट माखट फराळ 
गोडवा ह्रदयात भरतो 
भुई भर सांडलेल्या 
बारीक सारीक कणांनां
निसर्ग उचलून नेतो  ||३||

फटाकेही फोडलेले 
दिसले चार दोन लहान 
असह्य वेदनेने कोलमडून 
पडलेले म्हातारे तिथेच 
कुडकुडत बसलेले होते  ||४||

पानां फुलांचे तोरण 
शेणा मातीची सारवण 
बहिण भावाची माया 
पाझरते डोळ्यांत हसऱ्या 
माहेरच्या प्रेमाची आठवण ||५||

या गडद अंधारावर सुध्दा 
मात करणारी एक पणती 
अजूनही जळते आहे 
आकाशातल्या शुभ्र चांदण्यांला 
खिजवू पाहते आहे  ||६||

किती? थोडे आयुष्य
या इवल्याशा पणतीला 
अन् क्षणभंगुर सुखासाठी 
धावणारे आपण होऊया 
तीच एक पणती  ||७||

कवी/गीतकार- पंडित निंबाळकर 
मु पो सांगवी भुसार ता कोपरगांव 
जि अहमदनगर 
७९७२५२३७१७

©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar 
#kavita
#Ekpanati
#Diwali

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile