Find the Best panditnimbalkar Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutpan card status with pan number, link pan with aadhar, pan link with aadhar card 6600, link aadhaar with pan card 33100, link aadhaar with pan 60500,
Pandit Nimbalkàr
हा डाव जिंदगीचा खेळावाच लागतो प्रतेकाला मांडलेला हा डाव जिंदगीचा आपण फक्त लढायचं दोस्ता जिंकन हरणं भाग खेळाचा ||१|| कधी वेळ, पैसा आणि नाती याचं खेळाचा भाग होतील ही तुझं साम्राज्य तू स्वतः आहेस अडी अडचणी त्या असतील ही ||२|| तीच वाट, तोच त्रास नव्याने पण तुला चालायचचं आहे तेच अडथळे, तीच स्पर्धा आताही पण तुला जिंकायचचं आहे ||३|| धरती हलेल अन् आभाळ झुकेल पाय मात्र जाग्यावरच ठेव यशाचे मापदंड तुझ्या श्वासात आणि स्वतः वरच्या विश्वासात जपून ठेव ||४|| कवी पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #life #panditnimbalkar #motivacion
life #panditnimbalkar #motivacion
read morePandit Nimbalkàr
*एक पणती* दारात झोपडीच्या, एक पणती मिणमिणती हलकेच झोके घेत, सुख प्रकाशाचे उधळीत, वाट दावते आयुष्याला ||१|| फाटक्या रांगोळीची पायघडी उभी स्वागताला अस्ताव्यस्त संसाराची रेखाटलेली छबी जणू मांडलेली जाणत्याने ||२|| तिखट माखट फराळ गोडवा ह्रदयात भरतो भुई भर सांडलेल्या बारीक सारीक कणांनां निसर्ग उचलून नेतो ||३|| फटाकेही फोडलेले दिसले चार दोन लहान असह्य वेदनेने कोलमडून पडलेले म्हातारे तिथेच कुडकुडत बसलेले होते ||४|| पानां फुलांचे तोरण शेणा मातीची सारवण बहिण भावाची माया पाझरते डोळ्यांत हसऱ्या माहेरच्या प्रेमाची आठवण ||५|| या गडद अंधारावर सुध्दा मात करणारी एक पणती अजूनही जळते आहे आकाशातल्या शुभ्र चांदण्यांला खिजवू पाहते आहे ||६|| किती? थोडे आयुष्य या इवल्याशा पणतीला अन् क्षणभंगुर सुखासाठी धावणारे आपण होऊया तीच एक पणती ||७|| कवी/गीतकार- पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगांव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar #kavita #Ekpanati #Diwali
#panditnimbalkar #kavita #Ekpanati #Diwali
read morePandit Nimbalkàr
#FourLinePoetry छाया है घना अंधेरा चारों ओर एक खिडक़ी उजाले की बाकी है दम घुटने लगा है साजिशे देखकर मन में दिल जितने का इरादा काफी है ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #poem #fourlinepoetry
#panditnimbalkar, #poem #fourlinepoetry
read morePandit Nimbalkàr
निकला है सूरज मन में रखों तुम थोडा-सा धीरज देखना कल जरूर निकलेगा सूरज हुनर देखकर हर कोई उठेगा गरज भाले की नोक से गोल्ड जीता हैं नीरज पंडित निंबाळकर ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar #neerajchopra
#panditnimbalkar #neerajchopra
read morePandit Nimbalkàr
पूर आला आला पुर गेलं घरदार वाहून गुरं ढोरं झोडपली डोळे वाहती पाहून ||१|| धप्प पडली भिंत दुर पळालो घाबरून भांडी कुंडी गडप मुलं बसती कुशी शिरून ||२|| बाप ढिगा खाली गाडला धरला हंबरडा दाबून माझी तीचं साऱ्यांची गत जिवंत जरी गेलो मरून ||३|| चिखल चिखल भोवती पाय रक्ताळले तुडवून भुक पोटाची रिकाम्या गेली पिकावानी सडून ||४|| तहान मागलं का? पाणी पाणी आलं मरण घेऊन दार ठोठावू आता कुणाचं दार स्वप्नांचे गेले उडून ||५|| असा कसा कोप झाला गांव क्षणात गेलं वाहून खेळ जिवनाचा खेळाया बळ सांगा आणावं कुठून ||६|| कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #पूर , #panditnimbalkar , #kavita
#पूर , #panditnimbalkar , #kavita
read morePandit Nimbalkàr
बहीण पाठीराखी सर्वांत मोठी बहिण भारती तिच्या पाटची मिना नांव तिचे मधला लाडोबा मीच बरका ज्योती, छाया नांव शेवटचीचे ||१|| उसतोडीला जायच्या मोठ्या दोघी शाळा सातवीत सुटली कायमची आम्ही तिघे होतो आजीसोबत गावी लहानी स्वयंपाकात मदत करायची ||२|| भाऊ लाडका होता त्या चौघींचा खाऊची वाटणी होती माझ्याकडे खेळणी घे पण शाळा शिक म्हणायच्या दुखल्यावर घालायच्या देवाला साकडे ||३|| बापाचा आधार दैवाने अर्ध्यात नेला आईला हातभार बहीणींनी दिला माझ्या शाळेचा खर्च मजुरीत केला लग्नासाठी होती पुण्याई गाठीला ||४|| हट्ट नाही राखीला, ना भाऊबीजेला सुख लाभू दे म्हणातात भाऊ तुला माझं हे अस्तित्व आहे त्यांच्या मुळे या चौघी बहीणींच पाठीराख्या मला ||५|| कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #rakhi #DearCousins
#panditnimbalkar, #Rakhi #DearCousins
read morePandit Nimbalkàr
ओढ तुझी पांडुरंगा शीर्षक - वारी यंदाची चुकली धाव घेई पांडुरंगा भक्ती अंतरी कोंडली साथ कोरोनाची येता वारी यंदाची चुकली ||धृ|| ओढ तुझी पांडुरंगा माझ्या मनाला लागली आली बघा एकादशी पायी दिंडी ती निघाली ||१|| हरी नामाचा गजर टाळ, मृदंगी चालला अश्व, झेंडे, वीणा, माळ टिळा कपाळी लावला ||२|| डोई तुळशी घेऊन मुखी भजन म्हणते मागे सोडून संसार विठ्ठू भक्तीत दंगते ||३|| भेट होता ज्ञान तुका थांबे पालखी दर्शना गाता अभंग संतांचे देव नाचतो किर्तना ||४|| मुकी झाले रे पंढरी चंद्रभागा ही रूसली दुर रुख्मिणी ती उभी तुझी माया का? आटली ||५|| धाव घेई पांडुरंगा भक्ती अंतरी कोंडली साथ कोरोनाची येता वारी यंदाची चुकली ||धृ|| कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #vitthal , #Vari , #pandharpur
#panditnimbalkar, #vitthal , #Vari , #pandharpur
read morePandit Nimbalkàr
सह प्रवास असतोच क्षणिक काय गंमत आहे ध्यानी मनी नसताना अचानक भेटणं अन् पाहताच आपल्याला आवडण इतकं कमी की काय सोबत प्रवास करणं म्हणजे केव्हढा मोठा आनंद हळुवार एक एक पदर उलगडत समजून घेणं थोडं हसणं, थोडं भावनिक होणं आणि जमलंच तर अर्ध अर्ध वाटून खाणं हा सह प्रवास कधी संपूच नये असं वाटत रहाणं तिचं किंवा आपलं मुक्कामाच ठिकाणं लवकर येतं अन् सह प्रवासाच स्वप्न भंगून जातं उरतात फक्त आठवणी मग त्या छळतात सुध्दा, आपणचं जपल्या तरीही एक मात्र आपल्याला नक्की माहीत असतं सह प्रवास असतोच क्षणिक सह प्रवास असतोच क्षणिक! कवी, लेखक पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar #सहप्रवास #Trees
#panditnimbalkar #सहप्रवास #Trees
read morePandit Nimbalkàr
प्रीत तुझी रोज सकाळी कुशीत माझ्या, चांदण्या रुपाची तू दिसावी स्वप्नात टप टप नाऱ्या केसांनी ओल्या, ह्रदयी अलवार छेडली प्रित मनात ||१|| आरसा बिलोरी लाजला पाहून, मृगनयनी, तारूण्य कलिका दिसता मी तर भोळा श्वास रोखून असा , रोमांचित झालो खळी गालावर उमटता ||२|| शिल्प सुरेख आखीव रेखीव, प्रेमात पडला असावा कलाकार सुध्दा अवखळ जल हे उधळीत लाटा मोहात झिजला कठीण कातळ सुध्दा ||३|| आला लहरत एक चावट भुंगा कळ दाटून थरथरली नवथर काया केसांत माळता गजरा होई सुगंधी प्रित तुझी बावरी लावी जीवाला माया ||४|| मी प्रेमात गहीऱ्या आकंठ बुडालो शब्द मधाळ होऊन कवितेत सांडलो स्वप्न ते विरून गेले हवेत धुक्या सारखे तरी रोज पहाटे नव्याने तुझ्यावर भाळलो ||५|| कवी गीतकार पंडित निंबाळकर मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव जि अहमदनगर ७९७२५२३७१७ ©Pandit Nimbalkàr #panditnimbalkar, #prittuzi #Mic
#panditnimbalkar, #prittuzi #Mic
read more