Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser1479206038
  • 171Stories
  • 60Followers
  • 1.4KLove
    592Views

शुभ पडघान

  • Popular
  • Latest
  • Video
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

हमीभाव दुधाच्या निच्चांकी दरांवर 
भाषा त्याची सदा चिडकी आहे...!!

पीक नुकसानीच्या भरपाईसाठी 
कायम बंद त्यांची खिडकी आहे...!!

पण निवडणूकीसाठी गर्भश्रीमंत 
बहीण सुद्धा त्यांची लाडकी आहे...!!

#लाडकी बहीण...!!

©शुभ पडघान #sad_shayari
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

हमीभाव दुधाच्या निच्चांकी दरांवर 
भाषा त्याची सदा चिडकी होती...!!

पीक नुकसानीच्या भरपाईसाठी 
कायम बंद त्यांची खिडकी होती...!!

पण निवडणूकीसाठी गर्भश्रीमंत 
बहीण सुद्धा त्यांची लाडकी होती...!!

©शुभ पडघान #sad_shayari
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते 
त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!!
पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी 
हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!!

#पाऊस...!!
#संजीवनी...!!

©शुभ पडघान #raindrops
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

झोपडीच्या दाराशी दर्शन देण्यास 
अवतरला जणू साक्षात सावळा हरी...!!

मातीच्या बेधुंद सुगंधी अत्तराने माखून 
दैन्य मिटविण्या आल्या पावसाच्या सरी...!!

#पहिला पाऊस...!!

©शुभ पडघान
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

White ऐन तिशीतला एक रुबाबदार अधिकारी सायंकाळी न चुकता भटक्या कुत्र्यांना बिस्कीट चारतांना बघून लोक नाक मुरडायची...!! एक उच्चशिक्षित अधिकारी असं भटक्या कुत्र्यांना जवळ करणे हे तथाकथीत उच्चभ्रू वर्गाला हिणकस वाटणे स्वाभाविक होते...!!
एके दिवशी हिम्मत जोडून एका गृहस्थाने सदर कृत्याबद्दल अधिकाऱ्यास विचारले असता अधिकारी सद्गतीत होऊन म्हणाला माझ्या शेतावर असाचं एक पाळीव कुत्रा होता त्याला पोळी चारल्याखेरीज मी स्वतः कधी अन्नाला शिवले नाही मध्ये अचानक परीक्षेचा निकाल लागून अधिकारी झालो तसा इथे येण्याअगोदर त्याला शब्द दिला तुझ्या रूपात गरजवंत कुत्र्यांना खायला घातल्याखेरीज अन्न घेणार नाही आणि त्यासाठी एका मुक्या जीवाला दिलेल्या शब्दासाठी ही मोहीम...!!
गृहस्थ उत्तर ऐकून निरुत्तर झाला...!!

©शुभ पडघान #Sad_shayri
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

बरोबर ऐकलंस मित्रा तू मी निराशेच्या खोल गर्तेत आहे...!!
निमित्त निराशाचं का असेना पण लोकांच्या चर्चेत आहे...!!

©शुभ पडघान #boatclub
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

मिटणार नाहीत कधी राज्याच्या सीमा इथल्या 
रक्तलांच्छित तलवारीने त्या आखल्या आहेत...!!

चिवट आहे माणूस इथला कारण संत शुरांच्या 
संस्काराने त्याच्या हातच्या रेषा माखल्या आहेत...!!

#महाराष्ट्र दिन...!!

©शुभ पडघान #safar
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

स्वर्ग नरकानंतर मेलेल्या व्यक्तीस पुन्हा भेटण्याचे ठिकाण म्हणजे मतदान केंद्र...!!
😜
#एक अनुभव...!!

©शुभ पडघान #GoodMorning
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

White दान मग ते संपत्ती, ज्ञानाचे असो वा मतांचे गरजवंतांच्या झोळीत घातल्यास अनंत जन्माचे पांग फिटून नव्या उत्कर्षांस वाट फुटते...!!

#मतदान दिन...!!
#लोकसभा निवडणूक...!!

©शुभ पडघान #VoteForIndia
d17e68ff3dca19e8bfdf687dbd70fbdf

शुभ पडघान

White दान मग ते संपत्ती, ज्ञानाचे असो वा मतांचे गरजवंतांच्या झोळीत घातल्यास अनंत जन्माचे पांग फिटून नव्या उत्कर्षांस वाट फुटते...!!

#मतदान दिन...!!
#लोकसभा निवडणूक...!!

©शुभ पडघान
  #VoteForIndia
loader
Home
Explore
Events
Notification
Profile