Nojoto: Largest Storytelling Platform

जिवलगाहूनही प्रिय मित्र तू समृद्धीचा शांत सुशील न

जिवलगाहूनही प्रिय मित्र तू समृद्धीचा 
शांत सुशील निरागस तू निखळ हास्याचा..
शब्द सारे उभारले आज तुझे कौतुक करण्यासाठी 
अरे नेहमी तूच म्हणायचास समृद्धी एक कविता कर माझ्यासाठी....
का बांधू नये मी सांग सारे कौतुकाचे बांध 
कोणतीच आशा उरी नाही तू इतका प्रेमळ का सांग..
भेट झाली नकळत आपली NSS चा तो कॅम्प 
त्यानंतर मात्र आपल्या मैत्रीचे ट्राफिक जाम..
विचारही केला नव्हता की तू इतका चांगला मित्र बनशील 
मी चार दिवस reply न करूनही पुन्हा तूच msg करशील.. 
प्रत्यक्षात कधी बोललो नाही जास्त ना कधी Wtsp वर 
मैत्रीत गोडवा मात्र तोच जसे साजूक तूप पोळीवर.. 
काय लिहू किती लिहू काहीच कळत नाही 
समीर...तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाच्या नशिबात नाही.. 
हाच हात दोस्तीचा तुझा खूप साथ देतो 
तू भले सोबत नाही पण तुझा आभास नेहमीच असतो..
कित्येक जन्म लागतील तुझा विसर पडायला 
पण प्रत्येक जन्मात समीरच असेल समृद्धीच्या सोबतीला..

©Samruddhi
   #marathimeme #marathiinspirations #mimarathi #marathiquotes #marathibana #marathitradition #marathiculture