Nojoto: Largest Storytelling Platform

Best लढायचं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लढायचं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutलढायचे नाही, रामायण लढायचं, लढायचं सोंग, लढायचं गाणे पाठवा, लढायचं गाणं,

  • 3 Followers
  • 3 Stories

Shankar Kamble

जरासे....
क्षणभंगुर हे श्वास लाभले शाश्वत जगणे करू जरासे
आडोशाला पळभर थांबून निसटले ते स्मरू जरासे..

अभेद्य आणि भरभक्कम कर तटबंदी तू पुन्हा मनाची
घात घालूनी टपले वादळ पिसाट होवून भरू जरासे..

कोळून प्यालो आज हलाहल घोट रिचवले तसेच ओठी
चिरडलेल्या तृण पात्याचे भाले करुनी मरू जरासे..

सैरावैरा धावत सुटले निमिष एक ना कुठे थांबले
अकलेच्या या व्यर्थ वल्गना घासून ठिणगी पुरू जरासे..

शिडावीना ही नाव भरकटे खेळ हवाली तुझ्याच लाटे
पोहीन म्हणतो पाठ प्रवाही बुडलो,तरलो उरु जरासे..

खूप मागणे खूप सांगणे टिचभर झोळी गगन झाकणे
एक आरोळी रान पेटवू निशाण रोवून ठरू जरासे..

©Shankar Kamble #titliyan #श्र्वास #जीवन #जीवनअनुभव #लढा #युद्ध#संग्राम #जीवनगाणे #लढायचं

Dileep Bhope

🌴🌧️⛈️🌴🌧️⛈️

संकटामुळे माणूस कधीच संपत नाही.  लढायचे विसरला की मग तो उरत नाही.

"येवू दे वादळे, झडू दे पान पान, वाहू दे रान
पंखात बळ जोवर, उडायचे थांबणार नाही"

©Dileep Bhope #लढायचं

Shankar kamble

*आवेशाची ललकारी* 
 *विरून गेली सांग कुठे?* 
 *अंगाराची धग ही निवली* 
 *मशाल विझली सांग कुठे?* 

 *अन्यायाच्या दारी याचक* 
 *न्याय बिचारा तिष्ठतसें* 
 *बटीक होवून करी चाकरी* 
 *दाद मागू सांग कुठे?* 

 *न्याय, धर्म अन नीतीचे* 
 *वस्त्रहरण हे इथे रोजचे* 
 *लाज झाकण्या धर्माची* 
 *कृष्ण राहिला सांग कुठे?* 

 *सैल झाली वज्रमूठ अन* 
 *बोथट झाला म्यान भाला* 
 *स्वाभिमाना कलम गर्दनी* 
 *धार लोपली सांग कुठे?* 

 *जाती-पाती मधे अडकला* 
 *रंगा-झेंड्यामध्ये विखुरला* 
 *जात मानव एक विसरला* 
 *कोण चुकला?सांग कुठे?* 

 *सळसळणारा धमन्यांमधला* 
 *तप्त शीलारस गोठून गेला* 
 *बधीर त्या जाणीवा, वेदना* 
 *मूक झाल्या सांग कुठे?*

©Shankar kamble #न्याय #अन्याय #लढा #झुंज #विद्रोही #लढायचं 

#Dark

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile