Nojoto: Largest Storytelling Platform

Best आठवतात Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आठवतात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआठवतात का बालपणीच्या कविता, आठवतात का, आठवतात बालपणीच्या कविता, आठवतात ते दिवस, आता आठवतात,

  • 3 Followers
  • 3 Stories

drdeoshinde48

aajoba😍

read more
😍##नसलेल्या आजोबांच असणार प्रेम##😍

नेहमी जेवताना आजोबा माझे लाड करत असत 
मला आपल्या ताटातला घास नेहमी भरवत असत
जेवता जेवता मधेच थांबत असत
आणि एक भला मोठा ढेकर देत असत
मी म्हणायची रागवून
आजोबा हे काय करताय तुम्ही
आजोबांचं त्यावर उत्तर असायचं हसून 
अग पोरी मी फक्त ढेकर देतोय
 आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल 
 मग आजोबा म्हणायचे ज्याला असत टक्कल
त्यालाच असते जास्त अक्कल 
मी खिजवून म्हणायचे आजोबा म्हणजे यमकासाठी तुम्ही आता काहीही लढवणार का शक्कल
 आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात

आजोबा आपल्याच नादात नेहमी गात असत
गाता गाता मधेच थांबून स्वतःशीच गोड हसत असत
मी जवळ गेले की मला म्हणत
पोरी मी सांगतो ते ध्यानात ठेव
एकटं एकटं जाता आलं पाहिजे
आणि स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे
  मी गोंधळून जात असे आणि विचारात असे म्हणजे काय
 मग आजोबा मोठ्याने हसत असत आणि बोलत
 म्हणजे काय? म्हणजे काय?
इवलीशी तू आणि इवलेशे तुझे पाय
 आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात

 मी म्हणे आजोबा एक गोष्ट विचारु? हा पोरी बोल
आजोबा तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?
वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की 
एक ती अशी होती
दुसरी ती तशी होती 
अशी आजोबाशी नेहमी मस्ती चालत होती
इतक्यात खोलीत आजी यायची,
 आणि आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची 
 आणि आजोबा चटकन विषय बदलायचे
घसा खाकरत म्हणायचे
आता मी तुला शिकवतो गाणे कसे म्हणायचे
आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं हसरं जग मूक मूक करून जातात

आजोबा संध्याकळी अंगणात खुर्चीवर एकटेंच बसत
एकटक डोळे लावून दूर कुठे बघत असत
दूरदूरच्या ढगात असत
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत 
पाय न वाजवता मी हळूच तिथे जाई
त्यांच्या आरामखुर्ची मागे उभी राही
काय बघत असतील हे मी दूर पाही
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे
मग मी हळूच हाताने त्यांचे डोळे बंद करत असे
हि आहे माझी परी कारण हे हात आहेत इवलेशे
मग मी हसत असे आणि ते माझी पप्पी घेत असे
आता घरी गेल कि आजोबाच्या धुरकट खोलीत फक्त आठवणी आठवतात
 आणि माझं आठवणीतलं  हसरं जग मूक मूक करून जातात aajoba😍

Gauri Tadklaskar

आठवण ती लहानपणीची..

read more
आजही आठवण येते ती लहानपणीची
किती मज्जा असायची आम्हा भावंडाची
नव्हते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण सोबत असायचो
भांडण भरपूर होते पन दुपटीने प्रेम करायचो
आई पन रागवा रगीव करीत असायची
पन पत्ते खेळताना ति पन डाव मांडायची
नव्हता मोबाइल तेव्हा फोटो काढायला
तरीही मनामधे ते क्षण जपायचो नव्हता पलंग अन गादीचा बिछाना
पन अंगणात रातच्याला असायचा आमचा धिंगाणा
गेले ते दिवस अन बदलली स्थिति
थोड थोड करत आपलेच दूर जातात किती
आता आलो एकत्र तरी करतो मोबाइल वर चॅट
राहिलीच नाही आता तेव्हाची मौज फार
पन एकांतात बसल्यावर आठवतात ते दिवस
अस वाटत हे इलेक्ट्रॉनिक जग सोडून एकत्र येऊ परत
आठवतात मला ते लहानपणीचे दिवस
नव्हत आलिशान जगन पन साथ द्यायचे ते लोक... आठवण ती लहानपणीची..

ह्रदय मानव अशोक

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile