Nojoto: Largest Storytelling Platform

Best नाहीस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best नाहीस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutनाहीसे होणे meaning, नाहीसा meaning, नाहीसा करायचा, नाहीसे होताना,

  • 5 Followers
  • 24 Stories

Krushnarnav

आज तू नाहीस म्हणून...
मला जाता येत नाही... आपलं घर सोडून...
तू गेलीस तशी...
म्हणजे... माझं मन रमते असं मुळीच नाही...

पण मला थांबायला हवं...
तुला भेटायला च हवं...
कारण तुला सांगायला हवं...
तुझ्याविना किती कठीण होऊन बसलं आहे..
दिवसाचं सरण... रात्रीचं झुरण...

कदाचित... तू तुझी रमली असशील...
देव करो सुखात असशील...
माझी आठवण ही काढत नसशील...
पण सारे दिवस सारखे नसतात...

कधी आठवणींच वादळ येतं...
मनाचं तळ घुसळवून जातं...
तसंच काही तुझ्यासोबत होईल...
कदाचित तुला माझी आठवण येईल...
म्हणून तू मला शोधत येशील ...
पण एखादीच हाक देशील...
माझी साद आली नाही...
तर लगेच माघारी निघून जाशील...

तू  माझी वाट बघत थांबणार नाहीस...
कारण तुला ते कधीच जमणार नाही...
हे असं मात्र व्हायला नको...
अबोलच मरण यायला नको...
म्हणून मला थांबायलाच हवं...
तुझी वाट पाहायलाच हवं...

यात किती काळ जाईल कुणास ठाऊक...
#अबोल_प्रेम
@कृष्णार्णव #तुझ्याविना #अबोल_प्रेम #दुरावा #आठवण

R.K.

read more
ठरलं होतं आपलं तर तस का वागली नाहीस,
सोडून मला जाताना तू का बोलली नाहीस।
-R.K.

R.K.

read more
विणवुनी थकलो तुला तरी तू ऐकलं नाहीस,
अशी काय चूक केली मी की माझ्याशी बोलत नाहीस,
या वेड्या प्रेमविराचे एकदा ऐकून बघ,
ऐक ना अग एकदा परत माझ्याशी बोलून बघ।
R.K.

Dhanshri Kaje

Dhanashree Kaje: स्पर्श (कथा) स्वप्ना . गोड निरागस प्रेमळ 8 वर्षाची मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी . स्वप्नाचा आई बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा असा परिवार होता काका काकु ही होते पण ते बाहेर गावी राहत असत . स्वप्ना सुट्ट्या म्हणलं की नेहमी खुश असायची पण का कोण जाणे आज काल स्वप्ना खुप अस्वस्थ राहत होती . स्वप्नच कशातच मन रमत न्हवत स्वप्ना तिच्या मित्र-मैत्रिणीबरोबर ही खेळायला जात न्हवती सुट्टीच नाव काढताच आनंदुन जाणारी स्वप्ना आज मात्र दुःखी उदास रडवेली झालेली होती . तिचा रडवेला चेहरा चित्राला (स्वप्ना

read more
Dhanashree Kaje:
स्पर्श (कथा)
स्वप्ना . गोड निरागस प्रेमळ 8 वर्षाची मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी . स्वप्नाचा  आई बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा असा परिवार होता काका काकु ही होते पण ते बाहेर गावी राहत असत . स्वप्ना सुट्ट्या म्हणलं की नेहमी खुश असायची पण का कोण जाणे आज काल स्वप्ना खुप अस्वस्थ राहत होती . स्वप्नच कशातच मन रमत न्हवत स्वप्ना तिच्या मित्र-मैत्रिणीबरोबर ही खेळायला जात न्हवती सुट्टीच नाव काढताच आनंदुन जाणारी स्वप्ना आज मात्र दुःखी उदास रडवेली झालेली होती . तिचा रडवेला चेहरा चित्राला (स्वप्ना

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile