Nojoto: Largest Storytelling Platform

Best उद्धव_वृत्त Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best उद्धव_वृत्त Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 3 Stories

उमा जोशी

निजलेल्या देहावरती
उबदार घातली चादर
आईची दृष्टी निश्चल
अश्रूंचा नयनी सागर

सांत्वनास कोणी येती 
ती दिसता जाती गोठुन
ती मूक उसासे घेई
तोंडास पदर लावून

विश्वास तिला ना आता
दैवाचा वाटे काही
म्हातारपणाची काठी
दुसरी उरली ना काही

सोडून मला का गेला
अवचित घाईने पुढती
राहिला पसारा मागे
डोक्यात वादळे उडती

वय काय असे जाण्याचे
बसली जोडाया मेळ
ताळा नाही तो जमला
संपला घडीचा खेळ

पोकळ सगळे ते शब्द
पोकळ सारी ती वचने
मुलगा आधी गेलेल्या
आईचे निष्फळ जगणे
१५/०६/२०२३ @१६|४०

©उमा जोशी #निष्फळ_जगणे #आई #उद्धव_वृत्त

उमा जोशी

बाजार संपला सारा
कोलाहल झाला शांत
घे आवरुन पसारा तू
बघ समीप आला अंत

जगण्याची ओढाताण
केलीस आजवर फार
परि अंतिम क्षणास नाही
गडबड जाण्याची फार

मिळतील तुला जितके ते
ओढून श्वास घे पुढचे
एकदा इथुन गेल्यावर
ना येथे परतायाचे

त्या जगात वरती होतो
ताळा अपुल्या कर्मांचा
जोडून पुण्य पदराला
तू फोड घडा पापांचा

देवास विनवुनी सांग
हा जन्म असो शेवटचा
बा तूच दाखवी आता
तो मार्ग मला मोक्षाचा

ऐकून विनवणी असली
प्रिय देवाला होशील
फेरा सरेल जन्माचा
अन तुला मुक्ति लाभेल
२०/०४/२०२३ @ २३:३१

©उमा जोशी #मुक्ती #उद्धव_वृत्त

उमा जोशी

पोटात भूक असताना
चंद्रात भाकरी दिसते
पाण्याचा घेता घोट
भाकरी कमीही पुरते

                              आशेने येती पोरे
                              माझ्या दाराच्यापाशी
                              मी त्यांना भाकर देते
                              उरलेली माझ्यापाशी

सुख त्यांच्या डोळ्यांमधले
पाहून भागते भूक
ओठांवर फुलते हसणे
अन अश्रू गळती मूक

                              कोठली कोण ही पोरे
                              लागतो लळा का यांचा?
                              ती दिसता मनात माझ्या 
                              फुटतो पाझर प्रेमाचा

त्यांना नाही आई अन
वांझोटी माझी कूस
ममतेचे देउन देणे
देव म्हणे डोळे पूस 

                              हे नाते ना रक्ताचे
                              सोयरीक नाही कसली
                              ती देव जोडतो नाती. 
                              ही मनास ओळख पटली
२२/११/२०२२ @ १६:३०

©उमा जोशी #ओळख #उद्धव_वृत्त #२_८_४

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile