Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4505030359
  • 37Stories
  • 45Followers
  • 236Love
    120Views

Krushnarnav

  • Popular
  • Latest
  • Video
9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

अविरत वाहणारी एक नदी..
ऐलतिरावर मी उभा., पलीकडे तू
किनाऱ्यावर एकही नाव नाही...
नदीवर एकही पुल नाही...
किनारे धरून 
पुढे जावं तर अफाट समुद्र लागेल
पोहता तुलाही येत नाही.., मलाही..
आणि भेट जिवंतपणीच व्हायला हवी...
अशा वेळी नदी आटण्याची वाट बघावी का..?
चालत जावं तेच दोन्ही किनारे धरून. 
तिच्या उगमाकडे..
जिथून तिचा जन्म झाला
त्या पल्याड कुठेतरी जमीन  भेटत असतेच की
तिथेच थांबू... त्या प्रेम नदीच्या उगमापलिकडे
मैत्रीच्या टप्प्यावर...
प्रत्येक नदीवर बांध घालायचा नसतो...

©Krushnarnav #उगमापल्याड


#अबोल_प्रेम 
#Sea
9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

मी उभा होतो इथे 
या किनाऱ्यावर...
क्षितिजावर विरत जाणारं..
तुझं अस्तित्व,
माझ्या डोळ्यातल्या हसण्याचे 
सगळे रंग घेऊन.,
आयुष्यात एकांताच्या... 
काळोख छाया पसरवत निघालं होतं..
एखाद्याला मृत्युदंड देण्याआधी... 
विचारली जाणारी शेवटची इच्छा तरी... 
तू मला विचारायची होतीस...!!

©Krushnarnav #शेवटची_इच्छा...🍁

#अबोल_प्रेम 
#प्रेम_कविता 
#alone
9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

धुक्याने नटलेल्या एखाद्या सुंदर पहाटे... 
स्वप्नाच्या कुशीत अलवार निजलेलो असताना..
न्हाऊन... ओल्या झालेल्या... केसांतून...
दवांनी भिजलेला... ओंजळभर प्राजक्त...
ती तिच्या नाजूक... चुडाभरल्या हातांनी...
जेव्हा अलगद... उशाशी ठेवून जाते...
तेव्हा... त्या फुलांपेक्षाही जास्त...
तिच्या त्या ओल्या केसांतून... येणाऱ्या गंधानेच...
श्वास दरवळून जातो... !!

©Krushnarnav प्राजक्त

#Love

प्राजक्त Love #मराठीकविता

9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

काळोख दाटतो गहिरा
मी घाव नवा पांघरतो
तू पुन्हा मला आठवते
पाऊस पुन्हा कोसळतो

तुटलेला एक किणारा
भिडतात हजारो लाटा
आभाळ फाटके माझे
दुःखाला हजार वाटा

चांदणे सुखाचे विझले
मिटल्या स्वप्नांच्या राशी
गळतात पाकळ्या काही
माझ्याही दारापाशी

निजतेच वेदना कुठली
आक्रोश संथ झालेला
डोळ्यातून निथळे अजुनी
तो पाऊस ओसरलेला

©Krushnarnav विरह

#Hope
9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

हळदीच्या अंगाने... 
छातीशी घट्ट बिलगून...
क्षणभरच तिचं मस्तक 
त्याच्या खांद्यावर विसावलं...
आणि भरल्या डोळ्यांनी 
तिने शेवटचा निरोप घेताना...

गालावरले अश्रू पुसत... 
त्याने तिचा चेहरा ओंजळीत धरला...
तेव्हा...
तिच्या अल्लड नखरेल नजरेत... 
आज अगदीच शहाणपण दिसत होतं...
स्वतः ला सावरत..
त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले...
आणि त्याच्यातल्या प्रियकराचा ही 
एकदमच बाप होऊन गेला...

©Krushnarnav निरोप...

#together
9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

तुला भेटल्यावाचुन माझ्या
मनास हल्ली करमत नाही
तुझ्या भेटीचे क्षणही असे की
क्षणभर काही थांबत नाही...

फिरून ही गर्दीत कधी या
सोडत नाही रिते रितेपण
कधी एकटे असूनही मग
गोंधळ का हा संपत नाही...

किती बोललो तरीही काही
राहून जाते तुला सांगणे
वेळोवेळी मनही माझे
मनासारखे वागत नाही...

©Krushnarnav तुझं अस्तित्व

#standout

तुझं अस्तित्व #standout #मराठीकविता

9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

मी तुझं असण्यापेक्षा तू माझं असणं
ही भावनाच खूप गोड आहे
आपल्या ठरलेल्या भेटीपेक्षाही
तुझ्या अनपेक्षित हाकेच मला जास्त वेड आहे..

तुझ्याही मनात माझ्यासाठी
हक्काचीच एक जागा आहे
तुला माझ्याशी बांधून ठेवणारा
हा नक्की कुठल्या नात्याचा
रेशीम धागा आहे

©Krushnarnav रेशिमधागा

#standout

रेशिमधागा #standout #मराठीकविता

9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

.....आणि 
कधीतरी एकदिवस तो तारा तुटेल... 
तेव्हा तू पुन्हा जन्माला येशील.... 
आणि मला अशीच अचानक भेटशील कुठेतरी...
तू नक्कीच विसरणार नाहीस मला...
पण जरा घाई कर... मी ही तारा झालो तर
हा ही जन्म असाच जायचा...

©Krushnarnav पुनर्जन्म...

#apart

पुनर्जन्म... #apart #मराठीकविता

9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

मिठितल्या अलवार क्षणांवर श्वासाचे गहिरे अत्तर...
डोळ्यांतील प्रश्नांना द्यावे ओठांनी हलके उत्तर...

©Krushnarnav उत्तर..
9faf7e91cab260cb1bcfadc4e62dbfe6

Krushnarnav

होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन
खरंच कुणीतरी पुसणारं लागतं

(read full in caption )

©Krushnarnav होतं असं कधीतरी
काहीच बोलू वाटत नाही
सारं काही शांत स्तब्ध
जणु पानच हलत नाही

फिरून मग गर्दितही
मन राहतं एकटं एकटं
काय झालंय जवळ घेऊन

होतं असं कधीतरी काहीच बोलू वाटत नाही सारं काही शांत स्तब्ध जणु पानच हलत नाही फिरून मग गर्दितही मन राहतं एकटं एकटं काय झालंय जवळ घेऊन #leaf #मराठीकविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile