Nojoto: Largest Storytelling Platform
riteshgadam4994
  • 12Stories
  • 4Followers
  • 59Love
    42Views

Ritesh Gadam

  • Popular
  • Latest
  • Video
0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

मैं गिरूंगा , मैं हारूंगा
 फिर भी बार बार खड़ा हो जाऊंगा ।

बूंद बूंद से किनारा कर के
में सागर बन जाऊंगा ।

सपने सजा कर आए हैं सारे
उन सपनों को ना बिखरने दूंगा ।
चाहे टूट जाए दुनिया सारी
पर खुद को ना टूटने दूंगा ।

नींद जुड़ेगी तो 
आग बन खड़ा हो जाऊंगा ।
किनारे पर कितना भी पानी हो
पर मे रेत का महल ना बिखरने दूंगा ।

जब देखेगी मुझे सारी दुनिया
तब मैं खड़ा आसमान में रहूंगा ।
चाहे कोई कितना भी खींचे मुझे
बंन पंछी में खुले आसमान में ऊडुगा  

              – रितेश गडम

©Ritesh Gadam
  #akelapan #उम्मीद #सपनोकी राह #हिंदी  motivational poem #fighter of life
0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

मैं गिरूंगा , मैं हारूंगा
 फिर भी बार बार खड़ा हो जाऊंगा ।

बूंद बूंद से किनारा कर के
में सागर बन जाऊंगा ।

सपने सजा कर आए हैं सारे
उन सपनों को ना बिखरने दूंगा ।
चाहे टूट जाए दुनिया सारी
पर खुद को ना टूटने दूंगा ।

नींद जुड़ेगी तो 
आग बन खड़ा हो जाऊंगा ।
किनारे पर कितना भी पानी हो
पर मे रेत का महल ना बिखरने दूंगा ।

जब देखेगी मुझे सारी दुनिया
तब मैं खड़ा आसमान में रहूंगा ।
चाहे कोई कितना भी खींचे मुझे
बंन पंछी में खुले आसमान में उड़ना ।

                            – रितेश गडम

©Ritesh Gadam #akelapan #उम्मीद #सपनोकी राह #हिंदी  motivational poem #fighter of life
0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

पाई पाई जमून पैसा बाप वावरपेरते.                       
               काया काया मातीतुन दाणा दाणा अंकुरते...  

  डवरून निदुनिया तन काढून टाकते    
 पिक वाढते जोमान बाप फवारा मारते
        आन पाण्याच्या वक्ताला पाणी चाट हे मारते
 पाणी चाट हे मारते बाप वाटुली पाहेते
       आस घेऊन पावसाची ढग पाहायला झुरते

माय देतेस हिम्मत बाप कष्ट या करत
भरघोस पीक होईल याचे सपन  पाहेते
सपनाची राख होते मन दुखात शिरते
मन दुखात शिरते माय बापाले सावरते
बाप सावरुनीया घेते घर पुढे चालवते

कर्जाच्या ओझंया पाई बाप विचार करते
विचार करुनी कर्जाचा बाप मराले पाहेते
बाप मराले पाहेते स्वप्नात देव येते
 भिऊ नकोस रे बाळा पाठीशी मी आहे
देवावरी ठेवून विश्वास बाप पुढेया चालते.

                  - रितेश गडम

©Ritesh Gadam #farmer#jagachaposhinda##jaykisan #जगाचा अन्न दाता


#farmersprotest
0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

चार दिवसांचा आनंद
चार दिवसांची वाट
अथांग प्रश्नांच्या रात्री नंतर
उगवेल का उत्तराची पाहाट...?

कधी चुकतो मी फार
कधी भुलतो मी वाट
असंख्य विचारांच्या भाडणात
मिळेल का सल्याची साथ...?

कधी विचारांचा समुद्र
तर कधी उत्तराची नाव
शर्यतीच्या आयुष्यात
वेडा ठरवेन का मला गाव...?

कधी विरघळुन टाकते भावना
तर कधी गोधळून टाकते शब्द
हार जीतीच्या खेळा मध्ये
हरून राहील का सगळे स्थब्ध...?
                     
                                       - रितेश गडम

©Ritesh Gadam #Time
0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.
0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

जेव्हा मिठीत तु असते
ती मिठी खुप गोड असते
जेव्हा तु मोकळ्या मनाने हसते
तेव्हा माझ सुंदर फुलपाखरू दिसते...

तुझ्या सोबत असताननाचे
स्वप्न नेहमी भासते
स्वप्नात येऊन माझ्या 
गालात गोड हासते...

तु समोर असतांना 
हरवुन जातो तुझ्यात मी
जगही विसरून जातो
डुबतांना तुझ्यात मी...

अनुभवतो तुला ऐकांतातही
गरदीतही तुलाच शोधतो मी..
                                - रितेश गडम

©Ritesh Gadam #Love

Love

0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

दाट ती सावली
गार तो वारा
आनंदाने भरून आला
    डोळ्याचा किनारा...

हिरव ते रान
मन मोहती छान
कान ऐकत होते
   पक्षांचे गीत-गान...

ओली ती माती
 सुगंधीत होती
वाहती ती नदी
    मन जिकंत होती...

अधुन-मधुन येती
पावसाच्या सरी
मनात डोलती
    आनंदाच्या लहरी...
                            
                             -रितेश गडम

©Ritesh Gadam #StarsthroughTree beauty of nature #marthi poem on nature #ritesh gadam poetry #nature lover .

#StarsthroughTree beauty of nature #marthi poem on nature #ritesh gadam poetry #Nature lover .

0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

आला दिवाळीचा सण
रंगात गुंतले मण...
काढे रांगोळी दारात 
येई लक्ष्मी घरात...

पाहुन दिव्याच्या प्रकाशाची जोती
मने आनंदी आनंद होती...
दिवाळीचा सण दुःख नेई दुर
दुःख विसरून आनंद होई खूप...

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण
लक्ष्मीच्या आशिर्वादाने घरात येई धन...
आनंदा संगे सुख समृद्धी येई
दुःखा सगे चीता दुर घेऊन जाई...

प्रत्येक दारी लागो दिवे
नेहमी आनंदी राहो सर्व मने...
               
                            - रितेश गडम

0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

माझ्या प्रत्येक हाकेत 
    हाक तुझी असावी...
सुख दुःख झेलतांना   
    साथ तुझी असावी....

माझ्या प्रत्येक यशात 
    हाथ तुझा असावा...
आयुष्याचे कोडे सोडवतांना
    साथ तुझा असावा.... 

ठेच लागली तर सावरायला
    नेहमी तु असावी...
लांबचा पल्ला गाठतांना
    साथ तुझी असावी....

चुकीच्या वाटेवर आवरायला
    नेहमी तु असावी...
आयुष्याच्या वाटेवर चालायला
    साथ तुझी असावी....
                                  -रितेश गडम #Bestfriendsday
0e5da1869299e50580ef325f33e8d9b8

Ritesh Gadam

कवी विचार #Heartbeat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile