Nojoto: Largest Storytelling Platform
dikshapatil4175
  • 24Stories
  • 28Followers
  • 379Love
    16.0KViews

Shabdagandha

  • Popular
  • Latest
  • Video
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

प्रेमाने मायेने सगळ्यांनाच आपलंसं करून टाकलंय
जीव लावून एवढा, बोलली होती तस वेड करून टाकलंय!
किती रे प्रेमाचा पाझर मनी वहावा असा....
गोडीने स्वतःच्या असं आयुष्य सुंदर करून टाकलंय!

©Radhika
  #marathi #marathicharolya #Prem #prem_nirala_ #marathiquotes #Love #marathimulgi
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

स्वप्नात सत्यात सर्वत्र मी तुलाच अशी पाहते
बासरितल्या स्वरात तुझ्या प्रेमाची छबी दिसते!
जग सार सुंदर फक्तं तुझ्यानेचं मज भासवते 
ओढ आहे जी पुन्हा पुन्हा तुजपाशी घेऊन येते!!

©Radhika
  #marathi #marathimulgi #marathiquotes #Prem #prem_nirala_ #LO√€ #charoli #charoli
#charoli_prem prem
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

कधी कृष्णसखी तू, कधी मुरलीधराची बासुरी धुंदमय
कधी कृष्णमुरारी तू, कधी प्रेमाचे लेखीले रंग स्वरमय!

कधी बीज ते प्रेमळ मैत्रीचे, कधी बहरती माया वृक्षमय
कधी निरागस तू अशी, कधी अल्लड वारा तू छंदमय!

©Radhika
  #mararhi_mulgi #marathiquotes #Love #krushnsakhi #Prem #Nikhal #marathi
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

कधी साक्ष असे चंद्र तारे
कधी सोबती अल्लड वारे 
तुझ्यामाझ्या नात्याला असे
सुखाचे अमर्याद प्रेमशहारे

©Radhika
  #marathi #marathicharolya #marathiqoutes #love❤ #Prem #prem_nirala_
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

Your heartbeats
Become sweetest music 🎶🎶
when YOU keep ME
close enough to YOU

©Radhika
  #English #englishquotes #marathimulgi #Love #Heartbeat #Music #youandme #loV€fOR€v€R #SweetMemories #loveandmusic
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

भुलाव तुझ्यावर की तुझ्या प्रेमळ भुलण्यावर
मनावर प्रेमाचे गीत छेडणाऱ्या तुझ्या डोळ्यांवर
हृदयस्पंदांनावर प्रेमाचे एकेक अक्षर कोरत्या
उंच झुलाव तुझ्यामाझ्या डोळ्यातल्या स्वप्नांवर

प्रेम करावे तुझ्यावर की तुझ्या गोड प्रेमावर
पुन्हा पुन्हा प्रेमात पाडत्या तुझ्या गोड हास्यावर
सुखाच्या पाऊसधारा मनाला चिंब भिजवत्या
प्रेमात पडावं प्रेम करावं कित्येकदा मी तुझ्यावर

©Radhika
  #marathi #MarathiKavita #Marathipoem #Prem #prem_nirala_ #Poetry #love❤
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

प्रेमसगरासम अथांग तुझे अस्तित्व 
माझे नदिसम त्यात वाहवत जाणे...
खारवल्या त्या प्रत्येक थेंबात मगं
तुझ्या गोडव्यात पुन्हा बिलगून जाणे...

©Radhika
  #Prem #prem_nirala_ #tuanimi #marathicharolya #marathiquote #marathimulgi #marathi #loV€fOR€v€R
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

विसरुनी जग सारे
माझ्यामध्ये गुंतशिल काय...?
जशी स्वप्नात तू माझी
तशी प्रत्यक्षात भेटशील काय...?

©Radhika
  #marathicharolya #marathimulgi #marathiquotes #Prem #proposal #fakttuch #L♥️ve #prem_nirala_
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

नकळत तुझी आठवण येणं
कशी ही ओढ माझ्या मनाला,
दूर जरी तू भासतो जवळ
कसे हे वेड मनाला,
चार ही दिशांना तूच तू
कशी ही माया मनाला,
तुझा तो स्पर्श तुझा तो सहवास
नेहमी छेडतो माझ्या मनाला,
नकळत तुझी आठवण येणं....

©Radhika
  #Marathipoem #MarathiKavita #athvan #marathimulgi #tujhiathvan #missing_someone #LO√€ #Prem #prem_nirala_
067efe1a150e49b1335b0384af8fd5a2

Shabdagandha

आठवांचा पाऊस होऊन ओघळतोस गालावर
तुझ्याशिवाय अश्रूंनी स्पर्शाव पटनारे का तुला?

केसातल्या गजऱ्यात तुझाच प्रेमसुवास असतो
कुणीतरी मोहित करावं रुचणार आहे का तुला?

पैंजनांत सुर, तू माझ्यासाठी गायलेल्या गीतांचा
तुझ्याविना मनी छेडती धून ऐकवणारे का तुला?

डोळ्यात साठत्या या छबीत फक्तं तूच तू असतो
रिक्त असे माझे नयन पाहवणार आहेत का तुला?

जीवप्राण होऊन श्वासात तूच दरवळत असतोस
कुणी इतकं जवळ व्हाव सहन होणारे का तुला? 

अपूर्ण अशा गोष्टी, तुझ्यानेच अखेर पूर्ण होतात
अर्धवट आपण असे, आवडणार आहे का तुला?

शब्दाशब्दात भाव फक्तं अन् फक्तं तुझाच असा
तुझ्याविना कविता सुचनार तरी आहे का मला?

©Radhika
  #MarathiKavita #Marathipoem #marathi #marathimulgi #Prem #tuanimi #virah #prem_nirala_
loader
Home
Explore
Events
Notification
Profile