असावं कुणीतरी नजरेतला भाव ओळखणार असावं कुणीतरी माझ्या शब्दांना पूर्ण करणारं. असावं कुणीतरी माझं मन जाणून घेणारं. असावं कुणीतरी विश्वासाने समजून घेणारं. असाव कुणीतरी हक्काने भांडणार, सांत्वन करणारं. असावं कुणीतरी माझं दुःख वाचणार अन सुख जपून ठेवणारं. असाव कुणीतरी संकटाच्या वाटेत खंबीरपणे साथ देणार. असावं कुणीतरी मायेने जवळ घेणारं अन आयुष्य भर माझी साथ देणारं...