आई सारखी जीव लावणारी स्त्री / मुलगी जर एखाद्या पुरुषाला भेटली तर ती त्या पुरुषासाठी / मुलासाठी हवं ते व्रत ,उपवास ,नवस ,करायला तयार असते.त्याला मिळवण्यासाठी त्याच्या आनंदासाठी त्याच्या जीवनासाठी आपल्या संसारासाठी त्याचं प्रेम मिळवण्यासाठी हवं ते करायला तयार असते.. आणि बहुतेकदा स्त्री ने मनात ठाणलं तर ती आपली लढाई नक्की जिंकते.. फक्त तिच्यात तो आत्मविश्वास ती जिद्द असणे गरजेची असते.. आणि जिच्या मनात पुरुषाबद्दल काही आत्मीयता प्रेम नसते ती स्वतःला फार काही त्रास करून न घेता मिळेल त्यासाठी फक्त जगत असते.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #chhat