Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8586158032
  • 694Stories
  • 33.9KFollowers
  • 9.1KLove
    1.4LacViews

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कवितेच्या विश्वात रमणारा

www.instagram.com/prit_poet_ashlesh_made

  • Popular
  • Latest
  • Video
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

White तिने काय स्वप्न बघितले माहिती नाही 
मी मात्र रोज नवनवीन स्वप्न बघत असतो 
सोबतीने आयुष्य कसं जगायचं दोघेही 
रोज ह्याच योजना करत असतो...

सिनेमातल्या प्रत्येक चित्रात 
मी आमचं आयुष्य शोधत असतो 
तीच माझी राधा आणि रुक्मिणीही तीच 
मी स्वतःमध्ये कृष्ण शोधत असतो...

संसार थाटायचा आम्ही दोघांनी मिळून 
म्हणून प्रेमाचा सुखद प्रवास अनुभवत असतो 
तिच्या सोबतीने सुखदुःखात आयुष्य काढण्याचा 
मी रोजच स्वप्न बघत असतो...

अगदी सुखात ठेवायचंय तिला 
म्हणून नको ते प्रयत्न करत असतो 
ती कायमची माझी कधी होईल 
रोज याच प्रश्नाचे उत्तर शोधत असतो...

हवं ते करायचंय तिला आनंदी ठेवण्यासाठी 
आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत असतो 
तिने काय स्वप्न बघितले भविष्याचे माहित नाही मला 
मी मात्र सोबत जगण्यामरण्याचे रोज स्वप्न बघत असतो...

ती म्हणेल ते करीन म्हणेल तसं वागेन 
मनातल्या मनात तिला हेच वचन देत असतो 
देवा फक्त एकदा तिला माझी होऊ दे कायमची 
हिच प्रार्थना प्रत्येक देवाजवळ क्षणोक्षणी करत असतो...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #life_quotes  poetry lovers poetry love poetry for her poetry quotes

#life_quotes poetry lovers poetry love poetry for her poetry quotes #Poetry

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

सुखी संसार थाटायला श्रीमंती आणि सोयी सुविधांचीच गरज भासत नाही...
समाधानी राहता आलं तर झोपडीतही दोन घास सुखाने खाता येते...
आणि समाधान नसेल किंवा प्रेम नसेल तर महालात सुद्धा पोट भरत नाही..
फक्त प्रेमानं आणि आनंदानं एकमेकांना दोष न देता संसार करता आलं पाहिजे...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #gandhi_jayanti  most romantic love shayari in hindi for boyfriend

#gandhi_jayanti most romantic love shayari in hindi for boyfriend #Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

खरं प्रेम करूनही भीतीपोटी व्यक्त नाही झालात तर पुढे असंच पच्छाताप करण्याची पाळी येईल..
म्हणून कोणाचं आयुष्य उध्वस्त करण्यापेक्षा वेळीच मोकळे व्हा, लढा स्वतःसाठी व आपल्या प्रेमासाठी.. गेलेली वेळ परत येणार नाही कधी..
समाज आणि परिवाराच्या भीतीने मनात ठेवू नका, घरचे बराच वेळ विरोध करतीलच समाज बोलेलच पण फक्त काही दिवस..
जिवाच्या आकांताने जर प्रयत्न केलंत आपलं प्रेम मिळवण्यासाठी तर एक दिवस नक्कीच सगळे तयार होतील फक्त हार मानू नका..
स्वतःचं आयुष्य स्वतःसाठी स्वतःच्या मर्जीने जगा..

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_qoute
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

आपल्या आयुष्यात निःस्वार्थ आणि स्वतःपेक्षाही जास्त जीवापाड प्रेम करणारं कुणी भेटलं की,आयुष्यात फार तक्रारी उरत नाही....

आणि मला आयुष्यात काही तक्रार नाही...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_qoute  love shayari

#sad_qoute love shayari #Love

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

White खूप प्रयत्न केलं आतापर्यंत 
जोडलेलं प्रत्येक नातं जपण्यासाठी 
तरीही कुठेतरी कमी पडतोच नेहमी 
कोणाला आपलंसं करण्यासाठी...

शंभरदा चुका केल्या हजार वेळा क्षमा मागितलं 
कमी पडलो फक्त पाय धरण्यासाठी 
समोरच्याच्याही चुकांकडे नेहमी दुर्लक्ष केलं 
तरी बोललो नाही कधी माफी मागण्यासाठी...

ज्यांना आपल्या आयुष्यात खरंच राहायचं असतं 
त्यांना मार्गच नसतो परत जाण्यासाठी 
ज्यांना जाण्यासाठी फक्त कारणे हवी असतात 
टपलेले असतात ते आपल्या चुका शोधण्यासाठी...

महत्वाचे काय हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं 
हजार चुकांवर पांघरून घालतात आपल्या नात्यासाठी 
पण ज्यांना कारणे हवी असतात फक्त 
त्यांना कोण अडवेल परत जाण्यासाठी...

खूप कमी लोकं मरेपर्यंत सोबत असतात 
बाकी नातं जोडतात फक्त वेळ निघण्यासाठी 
जे क्षणात नातं तोडून दुसऱ्यांना दोष देत बसतात 
त्यांना जगायला आवडतं फक्त स्वतःसाठी...

खूप काही गमवावं लागतं आयुष्यात 
कोणत्या एका नात्याला जपण्यासाठी 
ज्याला जमलं नातं निभावणं त्यालाच जमतं 
बाकीचे आहेतच अनेक नाती तोडण्यासाठी....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #love_shayari
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मिळवणं आणि गमावणं 
हे तर आयुष्य भर चालूच असणार 
असं समजायचं जे गमावलं ते आपलं नव्हतं आणि जे मिळवलं ते आपलंच आहे..
तसं खरं तर आपलं इथे काहीच नाही 
सारं काही एक दिवस सोडून जायचंच आहे,
फक्त काही गमावल्यावर क्षणिक त्रास होतो तर काही मिळवल्यावर आनंद.. बस इतकंच..
त्यामुळे काही गमावल्यानंतर फक्त त्यापेक्षा ही चांगलं मिळवण्याची धमक नक्कीच असली पाहिजे...
गमावलं म्हणून रडत बसायचं नाही आणि मिळवलं म्हणून जास्त आनंद ही नको...
फक्त गमावल्याचं दुःख करत बसू नका... आणि नवं काहीतरी मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करा..
आशा ठेवा मिळेलच तुम्हाला जे हवं आहे ते..
व्यक्ती आणि वस्तू जुने गेले की नवीन येतच असतात आधीपेक्षाही चांगले....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Sad_Status  Extraterrestrial life motivational shayari

#Sad_Status Extraterrestrial life motivational shayari #Motivational

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कुठे मिळेल आजच्या काळातही
 असं प्रेम निभावणारी बघायला 
हल्ली कल्पनेच्या पलीकडलं वाटतं हे सगळं 
प्रेमापेक्षा पैसा लागतो आता सोबत आनंदानं जगायला..

आता तर फक्त दोन दिवसांचा प्रेम इथे 
उपभोग झालं की निघतात मग नातं तोडायला 
कुठे मिळणार हल्ली असे निःस्वार्थ प्रेम करणारे ह्या जगात 
सगळ्यांनाच आवडतं आता वेळेनुसार पर्याय शोधायला...

मन नाही इथे घर अनं पैसा महत्वाचा 
आता शोधूनही सापडणार नाही गेलो तरी अशी बघायला 
नातं जपण्यापेक्षा दूर होण्यासाठी हजार कारणे इथे 
कारण, तसं खरं मन असावं लागतं इथे खरं प्रेम कळायला....

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Sad_Status  sad love shayari

#Sad_Status sad love shayari #SAD

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

एक प्रामाणिक आणि खरं प्रेम करणारी मुलगी तिचं आयुष्य पणाला लावून देते स्वतःच्या जोडीदारासाठी....
आणि नात्याची मिसाल कायम करून जाते स्वार्थी जगासाठी...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #good_night  very sad love quotes in hindi sad quotes about life and pain

#good_night very sad love quotes in hindi sad quotes about life and pain #SAD

63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रेम में पडे पुरुष ने.. हर वो काम छोड दिये जो उसे पसंद नहीं थे,
जैसा प्रेम पे पडा, Adjust करना सुरु कर दिया उस के लिये, खुद के लिए कम और उस स्त्री के लिए ज्यादा सोचना सुरु कर दिया, माँ बाप का राजकुमार सा लडका उस स्त्री के लिये काम करना सुरु कर दिया, Branded चिजे भुलकर सस्ती चिजो पर आ गया,और किसीकी ना सुननेवाला सिर्फ उस स्त्री का हर कहा मानता गया....
फिर भी वह पूछती रह गयी तुमने मेरे लिये किया ही क्या?

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #good_night
63dd580ebed700d1ce6a7fc731455084

अश्लेष माडे (प्रीत कवी )

स्वतःला बदलायचं असेल तर काही गोष्टी आत्मसात आणि काही गोष्टींचा °त्याग° हा करावंच लागतो.

©अश्लेष माडे (प्रीत कवी )
loader
Home
Explore
Events
Notification
Profile