Nojoto: Largest Storytelling Platform

केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे । शुभ चिंतना

केल्याने होत आहे रे
आधी केलेचि पाहिजे ।
शुभ चिंतनाने काही होत नाही
त्याला प्रयत्नांची साथ पाहिजे ।

एकटे बसून राहू नका 
मनुष्य समाजशील पाहिजे ।
फक्त घेना बॅंकेने प्रगती होत नाही
त्याला देना बॅंकही पाहिजे ।।

शुभचिंतन करावे
सत्कर्माने कमवावे ।
सन्मार्गी चालावे ।
सत्कार्यात योगदान द्यावे ।

माणुसकिने वागावे ।
हाचि खरा धर्म ।।
जीवन म्हणजे टाईमपास नव्हे
हेचि जाणावे त्वा वर्म ।।

©Mangesh P Desai
  #केल्याने होत आहे रे...

#केल्याने होत आहे रे... #मराठीकविता

1,291 Views