सह्याद्रीच्या दरी खोऱ्यात गुंजते मराठी संतांच्या वाणीतुन झळकते मराठी इतिहासाच्या पाना पानावर शोभते मराठी रयतेच्या मन मनात वसते मराठी प्रत्येकाच्या रक्तात सळसळते मराठी वाङमय , साहित्यात जपतो मराठी धर्म, पंथ , जात , एक मानतो मराठी भाग्यवान आम्ही आमुची जन्मभूमी मराठी महावंदनीय अतिप्राणप्रिय ही आमुची माय मराठी मायमाऊली , मायबोली आमुची असे शान मराठी लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.