Nojoto: Largest Storytelling Platform
vaishali6734
  • 1.3KStories
  • 17Followers
  • 27Love
    11.0KViews

vaishali

  • Popular
  • Latest
  • Video
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

जीवनात जे नाही 
त्याची खंत बाळगू नका
आले जे वाट्याला 
त्यात समाधान मानायला शिका

     शब्दसंगिनी   #cinemagraph
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

आपल्या शब्दाला
किंमत नसते जिथे
शब्दांचा बाजार
मांडू नये तिथे

     शब्दसंगिनी  #mrathicharoli
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

शब्दांतून भेटलो आपण
झाली ओळख जुनी
बंध प्रेमाचे अलवार रुजले
दोघांच्याही मनी 

शब्दा शब्दांतून दोघे
होतं गेलो व्यक्त
दोन मनाच्या भावना
आता होणार नाहीत विभक्त

शब्दातूनच उलगडले
दोन मनातील गुपित
जपून ठेऊ शब्द अनमोल 
आठवणीच्या कुपीत

शब्द तुझे नि माझे
दोघांचाही श्वास झाले
एकमेकांच्या शब्दाविना 
जगणे आता उदास झाले

शब्दसंगिनी-सौ. वैशाली साळुंखे  शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शब्दांतून भेटलो...

#शब्दांतूनभेटलो

#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दांतून भेटलो... #शब्दांतूनभेटलो #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

राधा कृष्णाच्या प्रेमाला 
पूजती सारे निरंतर
दूर राहुनी कृष्णाने
राधेस दिले ना अंतर

शब्दसंगिनी
✍🏻सौ.वैशाली साळुंखे  #mrathicharoli
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

काळजाला काळजाशी
शब्द तुझे जोडतात
तुझ्या काव्यातील भाव
हृदयाला भिडतात

शब्दसंगिनी
✍🏻 सौ.वैशाली साळुंखे   #cinemagraph
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali


मन समाधानी असेल तर
तनाचे सौंदर्य वाढते
जिद्द उरात असेल तर
अस्तित्व स्वतःचे घडते

         शब्दसंगिनी  #mrathicharoli
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

समोरचा चुकतो म्हणून
आपण नाही चुकायचं
मनापासून जोडलेलं नातं टिकावं 
म्हणून थोडं झुकायचं
     
          शब्दसंगिनी  #marathicharolya
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

प्रत्येक चांदणीला वाटते
चंद्र आहे माझा
रोज चंद्र होतो असतो
स्वतःमधून वजा

शब्दसंगिनी  #mrathicharoli
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

चंद्राचे आकाश
चांदण्यांनी भरले
प्रेम चंद्राने साऱ्या 
चांदण्यांच्या मनी पेरले

    शब्दसंगिनी #मराठीचारोळी
8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

विध्यार्थी जीवन

आयुष्यभर विध्यार्थी जीवन
जगत राहतो आपण
निसर्गाकडे कुतूहलाने
बघत राहतो आपण

शब्दसंगिनी #मराठीचारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile