Nojoto: Largest Storytelling Platform

आज माझ्या स्वप्नामध्ये ट्रॅफिक सिग्नल आला कुणीच स

आज माझ्या स्वप्नामध्ये ट्रॅफिक सिग्नल आला

कुणीच सध्या दिसत नाहीत म्हणून

काळजीत आहेत म्हणाला

मिनिटामिनीटाला काळजी घेणारे त्यांचे लाल डोळे

काळजीने दिपले होते

सळग्यांना अडवू शकतो बघ, कितीही वेग शमवू शकतो बघ

म्हणणारे सिग्नल्स व्यक्त होत होते...

विचारपूस करत होते, रस्ता क्रॉस करणाऱ्या

त्या आजी आजोबांची, लहानग्या लेकरांची

खंत याची होती त्यांना की कितीही डोळे लाल केले

तरी कोरोनाला त्याची भीती नाही तो थांबेल याची शाश्वती नाही

पण, माझं रोज ऐकणारे माझे मित्र आज माझं नक्की ऐकतील

स्वतःसाठी का असेनात घरातच काही दिवस बसतील

अशी आशा व्यक्त करताकरता त्याच्या डोळ्यांच्या कडा

पाणावल्या...

नियमाने वागणारा, कधीही काही न मागणार

आपला रोजचाच मित्र 'तो' वाट पाहतोय म्हणाला 

परत भेटायची...

- मनिष ज्ञानदेव कानडे #सिग्नल