Nojoto: Largest Storytelling Platform
manishkanade2240
  • 150Stories
  • 4.1KFollowers
  • 3.3KLove
    95.2LacViews

Manish Kanade

Author, Poet, Photographer....In pursuit of Happiness

  • Popular
  • Latest
  • Video
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

ते बालपण होते, रमण्यात गुंतलेले

हे संसार चक्र आहे, कामात जुंपलेले


ते आकाश दाखवायचे स्वप्न, सातत्य त्यात होते

हे संसार चक्र आहे, स्वप्नांत गुंफलेले

©Manish Kanade
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade


इकडे प्रेम आणि तिकडे राग

हा मनातल्या भिंतींचा भाग असतो

यातच राहतात आठवणी

ज्यात सुख दुःखाचा माग असतो...

- मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे

©Manish Kanade
  #WinterEve
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

तु नकळत 
समोर यावी
अन, आठवणींतील ती पाने 
परत चाळली जावी

असेही एकदा व्हावे....

                   - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #leaf
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

#मीहॉस्टेलाइट#

काय नाय होत रे ? म्हणणारे
मित्र यादीतून कमी होत चाललेत
गोळ्या औषधे देणारे लोकं
मित्र यादीत वाढत चाललेत

बऱ्याच आजारांवर
मित्रांची फक्त सोबत हे
जालीम औषध असते
कदाचित तेच काळाच्या ओघात
कमी होत जाताना दिसते

म्हणायला आपण 
व्हाट्स ऍप, फेसबुकवर टच मधे असतो
पण मैत्रीची ऊब ही
प्रत्यक्ष भेटण्यामधे असते

                     -  मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे

©Manish Kanade
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

आकाशातील चांदण्या कमी होत चालल्या आहेत
की, तुझ्या आठवणी...
 - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

शापित

अंधार दाटलेला
समई करी प्रदीप
मौनात श्वासभाषा
करी श्वास हे समीप

येता मिठीत स्वप्ने
उजळुनी जाई रात
भर पावसात होते
शापित गंधरात

टप टप करीत आली
सर आज ही मिठीत
ठेवुनी दंश गेली
गंधित जाईरात्र

- मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #Starss
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

©Manish Kanade #SunSet
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

अता मी अबोला
 न धरतो कुणाशी
आहे वेळ थोडा 
अन स्वप्ने उशाशी  
              मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #Light
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

आपल्याला गोड स्वप्नांत सोडून 
शब्द मागे जातात 
आपल्याला होणारा आनंद 
ते लांबूनच पाहतात.... 
     - मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade
0ab806decad07c907aff0539304862fe

Manish Kanade

डोळे तुझे मला
नेहमी काहिनाकाहितरी सांगतात
कधी वेगाने पळतात 
तर,कधी अचानक थांबतात
- मनिष ज्ञानदेव कानडे

©Manish Kanade #Dark
loader
Home
Explore
Events
Notification
Profile