#OpenPoetry विरहाच्या दुःखात रडताना मला कोणीच नाही गं आवरलं कसंबसं माझं मीच तेव्हा स्वतःला सावरलं, एकटं असताना पेन आणि डायरी आपल्या सोबत घेतलं आणि तुझ्याच आठवणीत कविता करायला लागलो, त्या लिहिलेल्या प्रत्येक कवितेत मात्र तुझाच चेहरा आठवावं लागलं आणि एक -एक शब्द लिहिताना मला खरंच रडावं लागलं, नसतं गं एवढं सोपं कविता लिहिणं त्या आठवणींच्या कविता लिहिताना मला रात्र रात्र जगावं लागलं... (प्रीत )