*सरपंच कसा असला पाहिजे? 1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा. शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल