■ पावसाळा दावून पाठ पळतो बापास पावसाळा पाण्याशिवाय छळतो शेतास पावसाळा..! झालेत खूप गोळा गगनी थवे ढगांचे कोराच वाटतो हा बकवास पावसाळा..! दुष्काळ पावसाचा शेतात नेमका हा अन् चिंब चिंब करतो शहरास पावसाळा..! शेतातल्या पिकाला वाहून पूर नेतो नजरेत मग बळीच्या नापास पावसाळा..! देतो रुजू बियाणे मातीत वावराच्या.. मग मारतो दडी का हमखास पावसाळा..! दुष्काळ आज ओला हा कोरडा उद्याला करतो असा तसाही उपहास पावसाळा..! आहेस तूच त्याचा आधार पावसा रे देतो सुहास्य अंती कुणब्यास पावसाळा..! ©संतोषकुमार विजय उईके #पावसाळा