Nojoto: Largest Storytelling Platform

...जुना शिरस्ता मोड म्हणालो ! कडू कारले माहित असत

...जुना शिरस्ता मोड म्हणालो !

कडू कारले माहित असतानाही त्याला गोड म्हणालो
हातावरच्या जखमेलाही, मी साधासा फोड म्हणालो..

नात्यामधला गोडवा सदा, टिकावा असे वाटे जर का
रुसवा..फुगवा..संशय घेणे, त्याला आधी सोड म्हणालो..

वादच होता शेतीचाही, अबोल्यास या सारा कारण
धरून राखी बहीण आली, बोल तिच्याशी गोड म्हणालो..

परदास्याची अशी चाकरी, किती पिढ्या तू करशील पुन्हा 
पुस्तक दे तू लेकरास अन् जुना शिरस्ता मोड म्हणालो..

प्रेमामधला तुला अबोला, आहे जर का संपवायचा
विश्वासाचा सांकव दोन्ही, काठांना या जोड म्हणालो..

निरोप घेताना विश्वाचा..अश्रूसोबत हळहळणारी
जीवनात या चार दोन तू, अशी माणसे जोड म्हणालो..

✍️ संतोषकुमार विजय उईके,
निल.पेडगाव,ता.सावली जि.चंद्रपूर
9359237225

©Santosh Uike #Santoshuike