गझल का इतके प्रेम तुझ्या वर आले ठाऊक नाही मी तुझ्यात गुंतल्यापासून, मी मला ठाऊक नाही उगाच होतो गर्द हा सूर्य जाण्याआधी सकाळ प्रेमळ होते, का ते? ठाऊक नाही मोकळ्या तुझ्या केसांमध्ये तो गजरा शोभतो मग गुलाब हसतो की रुसतो? ठाऊक नाही अन् ह्या स्वर्गात अप्सरा आहे म्हणते ऐकले मी तू समोर आहे माझ्या, ती कोण? ठाऊक नाही ही मेहफिल संपल्यानंतर प्रतिसाद भेटतो ती कोण आहे म्हणते, मी म्हणतो... ठाऊक नाही - तुषार एसएस घरडेकर ©Tushar SS Ghardekar #OneSeason #Love #gazal #marathi #marathikavi #tusharghardekar #प्रेम #गझल