कालच्या "मी" च्या गर्भातून उमलले आजची "मी" कालच्या चुका कालचं शहाणपण घेउन जन्मले आज "मी" प्रतिबिंबीत होत राहिल माझ्यात कुठेतरी कालची "मी" काही तोडलेले बंध काही नवं अंकुरलेलं घेऊन जन्मले आज "मी" स्त्रीत्वाचा हात धरून निभावली माझी नाती मी कधी नात्यात हरवत कधी स्वतःला शोधत अचानक स्वतःला सापडले "मी" ©Vaidehi Shhalu #vaidehipoetry #marathi #MarathiKavita #womansDay #Woman #Thoughts